यवतमाळ सामाजिक

एकाच वेळी चार सापाना दिले जीवदान

एकाच वेळी चार सापाना दिले जीवदान

हिवरी वन परिक्षेत्र अंतर्गत
टी 1 अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब मांगूळ (कारखाना) यांनी दिले अजगराला जीवदान.1)नाग 1)धामण 1)तस्कर 1)अजगर असे एकूण 4 सापाना दिले जीवदान
फ़ॉरेस्ट 1मा. वनपरीक्षेत्र अधिकारी हिवरी सी. डी.नेहारे , वन रक्षक एन. व्हि.तांभारे
यांच्या मार्गदर्शना खाली हिवरी येथे योग्य ठिकाणी सोडण्यात आले

टी 1 अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब. या नावाने संस्था काही काळापासून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणेच त्यांना असाच एक फोन नितीन हरके राहणार तरोडा यांचा फोन आला असता त्यांनी गावामध्ये मारोती देवस्थान मध्ये साप दिसल्याची त्यांनी माहिती दिली सर्पमित्र निलेश जोगे , शिवम जोगे , दर्शन जोगे ,अक्षय सयाम.मिलिंद वणवे. लखन कोडापे स्वप्नील जोगे यांना दिली.क्षणाचाही विलंब न करता मांगूळ येथील टी 1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब मधील सदस्य तिथे जाऊन पाहणी केली असता. तिथे त्यांना अजगर या जातीचा साप तरोडा गावामधील मंदिराच्या बाजूला दिसून आला. सापाची लांबी अंदाजे ७ ते ८ फूट असून १४ ते १५ किलो त्याचे वजन आहे त्याला अतिशय चपळाईने आपल्या ताब्यात घेतले व तेथील उपस्थित व्यक्तींना त्या सापाची माहिती दिली.टी 1 अवणी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब मधील सदस्य व वनअधिकाऱ्याचा समक्ष त्या अजगराला सोडण्यात आले.या बाबत
माहिती देण्यात आली अजगर या सापाची अधिकतम लांबी . 760 से.मी. (24 फीट 11 इंच ) इतकी असते. रंग व आकार: – राखाडी किंवा फिकट तपकिरी गडद तपकिरी धब्बे पोटाकडचा भाग पांढरा किंवा फिकट पिवळसर शरीर स्थूल खवले मऊ डोक्यावर कोणासारखी आकृती डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या. शेपटी आखूड
प्रजनन :- पाळापाचोळ्याचा ढीग करून मादी त्यात 20 ते 80 अंडी घालते. 90 ते 100 दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात.
वैशिष्टये:- निशाचर. जबड्याच्या पुढील टोकावर असलेल्या उष्णसवेदनाग्राहक खाचामुळे त्यांना भक्ष्य शोधण्यास मदत होते . भक्ष्याला तोंडाने पकडल्यावर शरीराला विळखा घालतो व आवळून गुदमरून मारतो मग भक्षाचा तोंडाकरून सुरुवात करून गिळतो मध्यम आकाराचा प्राणी पचवायला त्याला अंदाजे तीन आठवडे लागतात वन्यजीव स्वरंक्षण कायदा 1972 अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारी शेड्युल (1) मध्ये येतो

Copyright ©