यवतमाळ सामाजिक

31 ऑगस्ट रोजी यवतमाल का राजा चे दिव्य भव्य आगमन तर विविध वैद्यकीय सामाजिक उपक्रमाचे आयोजन

31 ऑगस्ट रोजी यवतमाल का राजा चे दिव्य भव्य आगमन तर विविध वैद्यकीय सामाजिक उपक्रमाचे आयोजन

यवतमाळ – यवतमाल का राजा नवयुवक गणेश मंडळ मारवाडी चौक यवतमाळच्या श्री च्या मुर्तिचे दि. 31 ऑगस्ट रोजी तलाव फैल येथील मुर्तिकार वनकर बंधु येथून श्री च्या मिरवणूकीचा शुभारंभ दुपारी 2 वाजता होणार असून या मिरवणुकेमध्ये शिवराज्य ढोल पथक, मोर पंखी पंखी आदिवास डंडारी नृत्य, आदिवासी ढेमसा नृत्य, गोंडी नृत्य, तुमसर का भव्य बेंजो बॅन्ड, बनारस का डमरु डान्स, शिव पार्वती एवं अघोरी उजैन, राजस्थानी डान्स, इंदौर येथील विशाल हनुमानजी वानर सेना, बासुरी वादन एवं सांस्कृतिक कला प्रदशन, धर्म ध्वजा घेऊन 11 घोडेस्वार, 40 धर्म ध्वजाधारी महिला, विविध प्रकारचे बॅन्ड पथक सह शहरातील प्रमुख चौकांमध्ये जागोजागी लाईव रंगोळी काढून अनेक ठिकाणी पुष्प वर्षावाने श्रींच्या मूर्तिंचे स्वागत करण्यात येणार असून ही श्री ची भव्य शोभायात्रा लोखंडी पूल, गांधी चौक, तहसील चौक, बस स्थानक चौक, दत्त चौक, ओसवाल मार्केट, जाजू चौक, आठवडी बाजार, शनी मंदिर चौक, सरदार चौक मार्गे मार्गक्रमण करित सायंकाळी 7.30 वाजता मारवाडी चौक येथे श्रींच्या मुर्तिंची स्थापना करण्यात येणार आहे.
गणेश उत्सवा निमित्त यवतमाल का राजा परिवार तर्फे निशुल्क महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दि. 1 व 2 सप्टेंबर रोजी संजीवन सुपर स्पेशालिटीच्या विशेष सहकार्याने अग्रसेन भवन येथे 1 ते 4 या वेळेत आर्थोपेडीक कान, नाक, घसा, कर्करोग, स्त्रीरोग, न्युरोलॉजी, जनरल सर्जरी, मेडिसिन आदिंच्या रुग्णांची निशुल्क तपासणी करण्यात येणार आहे तर दि. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते 8 या वेळेत निशुल्क ऍक्युप्रेशर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 3 सप्टेंबर रोजी नेत्र तपासणी शिबीर व उपचार डॉ. बादल टोणे यांच्या वतीने मारवाडी चौक येथे दुपारी 1 ते 4 पर्यंत करण्यात आले आहे तर 4 सप्टेंबर रोजी श्री च्या मुर्ति समोर मारवाडी चौक येथे त्वचारोग व अस्थिरोग निदान शिबीर डॉ. नेहा मुंधडा, डॉ. वरुण डहाके च्या सहकार्याने करण्यात आले आहे. दि. 5 सप्टेंबर रोजी योग प्राणायाम विज्ञान शिबीर अग्रसेन भवन येथे सकाळी 6 ते 7 या वेळेत विशेषज्ञ सौ. स्नेहा हिंडोचा यांच्या सहकार्याने तर 6 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथील सुप्रसिद्ध दंत रोग तज्ञ डॉ. अर्चना पालडीवाल, डॉ. पोबारु, डॉ. शितल काबरा यांच्या सहकार्याने दु. 1 ते 4 या दरम्यान मारवाडी चौक येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 5 या वेळेत महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत महा अथर्व पठण चे आयोजन श्री च्या मंडपात करण्यात आले आहे तसेच दि. 8 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नियमितपणे सकाळी व सायंकाळी श्री ची विधीवत पुजा अर्चना तसेच नियमितपणे अन्नदान महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळपाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती यवतमाल का राजा परिवार व नवयुवक गणेश उत्सव मंडळ मारवाडी चौक यवतमाळ चे अध्यक्ष मनोज पसारी यांनी कळविले आहे. मंडळाचे हे 59 वे वर्ष असून भाविक भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Copyright ©