महाराष्ट्र राजकीय

माऊंट आबू येथे पत्रकार , मीडिया प्रतिनिधींसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय मीडिया संमेलनचे आयोजन. अकोला जिल्ह्यातील पत्रकार रवाना.

माऊंट आबू येथे पत्रकार , मीडिया प्रतिनिधींसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय मीडिया संमेलनचे आयोजन.
अकोला जिल्ह्यातील पत्रकार रवाना.

29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022.रोजी `समाधान आधारित व सकारात्मक पत्रकारिता साठी माऊंट आबू येथे पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधींसाठी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय मीडिया संमेलनचे आयोजन.
ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाधान आधारित पत्रकारितेने समृद्ध भारत व सकारात्मक पत्रकारिता या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत.
यात वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि , मीडिया शिक्षण संस्था आदि क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील.संमेलनात महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे, यांचा नेतृत्वॉत महाराष्ट्राची टीम आज दिनांक 28 ला माउंट आबू साठी रवाना झाली आहे .निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबूअप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. सुंदर तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर-द·या, नेत्रदिपक सुर्यास्त आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय देलवाडा, अचलगढ,गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन,शांतीवन, ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध विशाल आध्यात्मिक शक्तिस्थाने सुद्धा आहेत. अकोला, वाशिम, येथून माऊंट आबू येथे होणाऱ्या मीडिया संमेलनात सहभागी होणारे पत्रकार , संपादक , जयदीप सोनखासकर ,गजानन हरणे, मिलिंद जामणीक , अविनाश बेलाडकर , अजय प्रभे , विलास नसले , प्रतीक कुरेकर , संजय उमक , दिलीप तिहिले , अतुल नवघरे , प्रवीण ढगे , अशोक उपाध्या. सुधाकर चौधरी. आधी सह अनेक प्रतिष्ठित पत्रकार मंडळी अकोल्यावरून आज राष्ट्रीय मीडिया संमेलना करीता रवाना झाली आहे. त्यांच्या निवडी बद्दल अनेक पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

Copyright ©