यवतमाळ सामाजिक

दोन स्विफ्ट डिझायर मध्ये अपघात एका डिझायर नी घेतल्या तीन पल्ट्या

दोन स्विफ्ट डिझायर मध्ये अपघात एका डिझायर नी घेतल्या तीन पल्ट्या

यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावरील दोन स्विफ्ट डिझायर मध्ये अपघात झालं सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
सवि.अर्जुना उड्डाण पुलावरील ४.४० वाजताच्या दरम्यान दोन कार मध्ये अपघात झाला, यवतमाळ येथून आर्णी कडे जाणारी डिझायर एम एच २९, ए. डी.५१२४,या डिझायर ला माघावून येणाऱ्या एम एच ३१, डी. व्हि.६८१५ नी मागच्या चाकास धडक दिली,हि धडक इतकी जबर होती की चालकाचे नियत्रंण सुटले व कारणी तीन पल्ट्याखात सरळ झाली तर डाव्या बाजूचा टायर कुठे पळाला दिसलाच नाही तर डिक्स चा चुराडा झाला तर कारचेही मोठे नुकसान झाले दैव बलवत्तर म्हणुन चालकास कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही या प्रकरणी यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शना खाली कुणाल कोलपल्लिवार,संजय राठोड,अविनाश वाघाडे तपास करीत असून दोन्ही वाहने यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली.

Copyright ©