यवतमाळ शैक्षणिक

सौ.शिलादेवी बोरा पब्लिक स्कुल मध्ये चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण

सौ.शिलादेवी बोरा पब्लिक स्कुल मध्ये चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण

आपला वाढदिवस साजरा करताना तो नेहमीच पर्यावरण पुरक असला पाहिजे या विचाराचे प्रसिध्द हदयरोग तज्ञ व शिलादेवी बोरा पब्लीक स्कुल चे अध्यक्ष डॉ हर्षवर्धन बोरा ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शाळेत मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून निसर्ग जोपासण्याचा संदेश देण्यात आला
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत या तुकाराम महाराजांनि लिहिलेल्या अभंगा प्रमाणे
आपण निसर्गाचे काही तरी देणे लागतो, झाडे लावुन त्यांचं संगोपन करणे हि आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. निसर्गाची आवड असल्याने वाढदिवसाचं औचित्य साधुन झाडं लागवडीची कल्पना सुचली. आणि शाळेनी हि कल्पना नुसती कल्पना न ठेवता प्रत्यक्षात कृतीत आणली. प्रत्येकानेच वृक्षरोपण करुन झाडं जगविले पाहीजे. औद्योगीकरणामुळे पर्यारणाचा ढासळत चाललेला समतोलपणा टिकवुन ठेवण्यास वृक्षसंवर्धन करणे गरजेचं आहे. असे मत सचिव संजय कोचे ह्यांनी ‘शाळेतील विध्यार्थ्यांनशी बोलतांना व्यक्त केलं.
शाळेच्या सदस्या सौ.उषा कोचे ह्यांनी
वृक्षारोपणाचे महत्व विषद करतांना म्हणाल्या मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वच्या संधर्भात महत्वाची भूमिका बजावीत आहे. मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात.
जन्मदिन निमित्त वृक्षारोपण करूया या उपक्रमाने मुलांना निसर्ग प्रेमाचा संदेश देण्यात आला व झाडे लावा झाडे जगवा या वाक्य सोबत निसर्गाचे महत्त्व सांगण्यात आले त्यानंतर डॉ हर्षवर्धन बोरा यांच्या जन्मदिना निमित्य चिमुकल्यांना फळ वितरित करून फळांचे आरोग्याला होणारे फायदे व उत्तम आरोग्यचे महत्व सुध्दा सांगण्यात आले या वेळी संस्थेचे सचिव संजय कोचे संस्थेचे सदस्य उषा कोचे, निलेश शेटे,अर्चना कडू, श्वेता बंधुके, मनीषा ताजने, वैशाली महाजन, मनीषा खोपे, पल्लवी देशमुख, हर्षा ढेरे, उडके, नेवारे, पूनम, क्रांती अलोने व शाळेतील विध्यार्थी उपस्थित होते.

Copyright ©