यवतमाळ सामाजिक

जलसुरक्षक यांत्रिकी प्रशिक्षण संपन्न

जलसुरक्षक यांत्रिकी प्रशिक्षण संपन्न

निव्हसिड नागपूर संस्थे अंतर्गत वापर एड प्रकल्प च्या सहयोगाने महिला आणि पाणी प्रकल्प अंतर्गत यवतमाळ येथे जलसुरक्षक यांत्रिकी प्रशिक्षण घेण्यात आले.

यवतमाळ हॉटेल टुलीप येथे यावेळी प्रशिक्षणाला प्रमुख पाहुणे उपस्थित विवेक कोंडे उपअभियंता यांत्रिकी विभाग जिल्हा परिषद यवतमाळ,जि समन्वयक उमेश तांबडे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाला सुरुवात झाली, तसेच यावेळी तालुक्यातील जलसुरक्षक, सरपंच, तालुका समन्वयक, मोबिलाईझर, सदस्य उपस्थित होते, तालुका समन्वयक राजु नगराळे यांनी सुत्र संचालन केले प्रमुख उपस्थित सर्व पाहुण्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जिल्हा समन्वयक मा उमेश तांबडे यांनी निव्हसिड नागपूर संस्था कशा प्रकारे जिल्ह्यात काम करत आहे, यांत्रिकी(टेक्नोकार्ट) प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश,जलसुरक्षकाची भुमिका जबाबदारी या विषयी मार्गदर्शन केले.मा विवेक कोंडे उपअभियंता यांत्रिकी विभाग जि प. यांनी. प्रोजेक्टर च्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत मोलाचे मार्गदर्शन केले.
हातपंप चे प्रकार हातपंप देखभाल व दुरुस्ती कशा प्रकारे करावी, दुरुस्ती करण्याची पध्दत.हातपंप व विद्युतपंप दुरुस्तीसाठी येणारा खर्च.हातपंप द्वारे पाणी न येण्याचे कारणे. व त्यावर उपाय योजना.
यांत्रिकी विभाग अंतर्गत महत्त्व पुर्ण योजना हातपंपाला सौर पंप जोडणी करणे, ज्यामुळे ५०/६० टक्के विजेची बचत करु शकतो. हातपंप हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, आपण स्वताहाची मालमत्ता समजुन काळजी घ्यायला पाहिजे. कॅच द रेन , जलशक्ती मंत्रालय अंतर्गत गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या रुप वाटर हार्वेस्टिंग करणे,
पाऊसाचा प्रत्तेक थेंब जमिनीत मुरवने.
जल जिवन मिशन हि महत्त्वाकांक्षी योजना प्रत्तेक गावांमध्ये वस्तीमध्ये पोहचली पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले तालुका समन्वयक सुनील नाईक यांनी जल जिवन मिशन पाईप लाईन वितरण प्रणाली, कशा पद्धतीने कार्य करते, जलस्त्रोत बंद होण्याचे कारण, पाईप लाईन देखभाल व दुरुस्ती कशा प्रकारे करावी, गावातील मुख्य जलस्रोत, या विषयी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला यवतमाळ निव्हसिड टिम तालुका समन्वयक लिला पेंदोर, मोबिलाईजर,अक्षय किरणापुरे, मोबिलाईजर,शंकर वैरागडे. जलसुरक्षक, सरपंच,सदस्य उपस्थित होते.
शुभम भावेकर यांनी आभार वेक्त केले.

Copyright ©