यवतमाळ सामाजिक

झरी तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायत डंक्यावर

 

झरी तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायत सध्या विविध कारणानी गाजत आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सदस्य संतोष विश्वनाथ पारखी यांच्यावर अपर जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेची कारवाईमुळे कार्यवाही केली आहे.
सविस्तर वृत्त असे की , अडेगाव गावातील ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर शेड टाकून कंपाउंड करून अतिक्रमण केल्याप्रकरणी तानाजी बंडू हिवरकर व शंकर दादाजी झाडे यांनी तक्रार केली होती . या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(1)( ज -5 ) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे . यामुळे अडेगाव गावात खळबळ उडाली आहे . त्या सोबत सदस्या वंदना उत्तम पेटकर हिच्या विरुद्ध खोटे व बनावट कागदपत्रे नामनिर्देशन दाखल करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदारांना झरी जामणी यांनी चौकशी करून त्या बाबतचा अहवाल मा जिल्हााधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा आदेश पारीत केला असून वंदना उत्तम पेटकर यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार दिसून येत आहे.
त्यामुळे मंगेश पाचभाई यांच्या गटातील पुन्हा एक सदस्य अपात्र हे नक्की झाले आहे.
याविरोधात दिनांक 12 जुन 2021 रोजी येथील रहिवासी शंकर दादाजी झाडे व तानाजी बंडू झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता . या तक्रारीची दखल घेत अपर जिल्हाधिकारी प्र. की. दुबे यांनी सुनावणी करून पारखी यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द केले आहे .

Copyright ©