यवतमाळ सामाजिक

शेतकऱ्यांच्या मागण्या,ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस पुन्हा रस्त्यावर

शेतकऱ्यांच्या मागण्या,ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस पुन्हा रस्त्यावर

शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हे आंदोलन मा.बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली वडगांव पो.स्टे येथे करण्यात आले
यावर्षी संततधार पाऊस व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या तोंडी येणारा घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेल्याने शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या ओझ्या खाली सापडला आहे. अशा परिस्थिती मध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात वाढतच असतांना सुध्दा शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे शासनाला जागे करण्या करिता आज वडगांव पो.स्टे येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी असंख्य शेतकरी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©