यवतमाळ सामाजिक

दिग्रस पत्रकाराचे मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

दिग्रस पत्रकाराचे मुख्यमंत्री यांना दिले वेदन

गौण खनिज प्रकरणात कार्यवाहीची मागणी

वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील करोडो रुपयाचा गौण खनिज रेल्वे कंत्राटदार यांनी राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगणमत करून खुल्या बाजारात विकला यासंदर्भात साक्षी पुराव्यासह भ्रष्टाचार उघडकीस करून दिल्यानंतर सुद्धा तसेच दोशींचे दोष व संबंधित अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर या भ्रष्टाचार प्रकरणातील सर्व दोषींना ,भ्रष्ट अधिकाऱ्यांना , ..वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी दिले. एवढेच नव्हे तर भ्रष्टाचार उघडकीस येण्यासाठी तक्रारदारअमोल ओमप्रकाश कोमावार पत्रकाराने उपोषण सुद्धा केले परंतु भ्रष्ट व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या ऐवजी प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदार पत्रकार अमोल कोमावार याचेवर प्रचंड दडपण आणून तसेच पदाचा गैरवापर करून त्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे भ्रष्टाचारांना वाचा फोडण्यासाठी ,त्यांच्यावर सक्त दंडात्मक कारवाईसाठी व पत्रकाराची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न त्याच्यावर झाल्यामुले अन्यायाला प्रकाशात आणण्यासाठी,तहसीलदार दिग्रस यांचे मार्फत मुक्यामत्र्यांना सर्व पत्रकानी निवेदन देऊन सरकारला जागे करण्यासाठी, तसेच कार्यवाही झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन “जिंकू किंवा मरू “यवतमाळ येथे करण्याचा राज्यातील सर्व पत्रकार आहे. त्याचबरोबर अधिवेशनामध्ये या संपूर्ण प्रकरणाबाबत दखल घ्यावी तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून यासंदर्भात निवेदने देऊन सरकारला या गंभीर प्रकरणावर चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई व पत्रकारावर झालेल्या अन्यायावर निवेदन देण्यात आले यावेळी दिग्रस येथील सर्व पत्रकार लुकमान खान लक्ष्मण टेकाळे पुरुषोत्तम कुडवे जय राठोड अजित महिंद्रे साजिद पतलेवाले ज्ञानराज ढोरे अजिज शेख कपिल इंगोले यशवंत सुर्वे सदानंद जाधव प्रफुल्ल व्यवहारे यांचे उपस्थित निवेदन देण्यात आले

Copyright ©