यवतमाळ सामाजिक

संध्याताई राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना फळ वाटप व स्वच्छता शिबीर

संध्याताई राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना फळ वाटप व स्वच्छता शिबीर

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिनिमित किनवट शिक्षण संस्था किनवट च्या सम्माननीय सदस्या तथा भाजपा केंद्रिय कार्यकारणी सदस्या संध्याताई प्रफुल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. एस के. बेंबरेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या परीसरात स्वच्छता शिबीर व उपजिल्हा रूग्णालय गोंकुदा येथे रुग्णांना डॉ. यु.बी. धुमाळे, डॉ. गडसिंग डॉ. ढोले. डॉ. तेलंग डॉ. तोटवाड यांच्या उपस्थित फळ वाटप करण्यात आले.

स्वछता शिवीरा प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.शेषराव माने यांनी रासेयो स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्व सांगीतले. वेगवेगळा उदाहरण व दाखल्याच्या माध्यमातून शरीराची, बुद्धीची, व आपल्या परिसराची स्वच्छता करावी. आसा संदेश आपल्या भाषणात दिला पुढे बोलताना म्हणाले की महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष उत्तमरावजी राठोड साहेब यांनी महाविद्यालयाची स्थापणा केली आहे. त्यांच्या विचार व कार्याची प्रेरणा घेवून या महाविद्यालयास विशाल व व्यापक वटवृक्ष बनवीले व सर्व सोयीसुविधा देण्याचे कार्य विद्यमान अध्यक्ष प्रफुल राठोड व त्याच्या सुविद्य पत्नी सौ. संध्याताई राठोठ करत आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्त स्वच्छता शिवीर व फळवाटप कार्यक्रम संपन्न झाला.त्याच्या वाढदिवानिमित्त शुभेच्छा दिल्या.प्रसंगी माविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के.बेंबरेकर उपप्राचार्य, डॉ. जी. एस. वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिबीर यशस्वी करण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी शेषराव माने, प्रा-पुरषोत्तम यरडलावार, प्रा. एस.यु.
जाधव प्रा. लता पेंडलवाड, यांनी विशेष मेहनत घेतली आहेत प्रसंगी – रासेयो- स्वयंसेवकानी महाविद्यालयाचा परिसर साफस्वच्छ केला. व उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केले. व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Copyright ©