यवतमाळ सामाजिक

जयश्रीताई चित्रे यांनी साधला भाजपा महिला आघाडी सोबत संवाद

जयश्रीताई चित्रे यांनी साधला भाजपा महिला आघाडी सोबत संवाद

प्रज्ञा सेलच्या महाराष्ट्राच्या सहसंयोजिका जयश्रीताई चित्रे यांनी काल दुपारी एक वाजता भाजप जिल्हा कार्यालय येथे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ मायाताई शेरे यांच्या सहकार्याने सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी शहर महिला पदाधिकारी नगरसेविका यांच्यासोबत जयश्रीताई चित्रे यांनी संवाद साधला संवाद साधताना त्यांनी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी यांनी ज्या योजना काढल्या आहेत त्या योजना सर्व लोकांपर्यंत घराघरात पोहोचवा अशा सुद्धा म्हणाल्या बऱ्याच महिलांना काही योजनांची माहितीच नसते त्यासाठी भाजपा महिला आघाडी यांनी नियोजन करून शेवटच्या टोकापर्यंत या योजना कशा पोहोचतील याचा प्रयत्न करायला पाहिजे अशा सुद्धा त्या म्हणाल्या गरोदर माता असो या जन्मताच मुलगी यांची व्यवस्था मोदीजींनी खूप चांगल्या प्रकारे केली आहे त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ झालाच पाहिजे आणि ते आपण सर्व महिलांनी त्यांच्यापर्यंत त्या योजनेचा लाभ करून द्यावा अशा सुद्धा जयश्रीताई चित्रे बोलत होत्या हर घर मोदी फक्त नारा च नाही तर हर घर योजना मोदीजींची आपण सर्व महिलांनी पोचवावे व त्यांचा लाभ करून द्यावा जर काही अडचण असेल तर नक्कीच मला विचारा त्यातून मी नक्कीच मार्ग काढेल आणि ज्या भगिनी उद्योग व्यवसाय करत असतील त्यांच्या व्यवसायाला मार्केटिंग कसा होईल याचा पण आपण प्रयत्न करू की त्यांना मार्केटिंग मिळायला पाहिजे असं पण काही बचत गटाच्या महिलांना त्यांनी सांगितले त्यांनी सर्व महिलांना खूप छान असे मार्गदर्शन केले संवाद साधण्यापूर्वी मीटिंग ची सर्वात व जयश्रीताई चित्रे यांचा पूर्ण परिचय शहर अध्यक्ष सौ उषा खटे यांनी दिला आणि काही जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती सुद्धा जयश्रीताई चत्रे यांच्या हातून करण्यात आली त्या वेळी उपस्थित जिल्हा सरचिटणीस जयश्री सुनील राठोड ड्रॉ पूजा मुन ठाकूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख माणिक पांडे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्राजक्ता टिकले जिल्हा सचिव लक्ष्मी सातपुते डॉक्टर यशहरी सूने शहर डॉक्टर सेल संयोजिका एडवोकेट शिल्पा घावडे डॉक्टर कवीश्वर ताई नगरसेविका नंदा जीरापुरे रीता घावतोडे लता ठोंबरे करुणा तेलंग प्रियंका भवरे वैशाली लोळगे सुनिता मडावी नेर दरव्हा दिग्रसच्या महिला प्रभारी माधुरी तंबाके नेर तालुका महिला अध्यक्ष कांचन जवळकर तालुका सरचिटणीस मीना खंडेल शहर सरचिटणीस मीनल पांडे माधुरी धायरा भारती जाठे शहर उपाध्यक्ष निवेदिता शर्मा प्रांजली राऊत भारती दोडके भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

Copyright ©