यवतमाळ सामाजिक

यवतमाळ ग्रामीण पोलीसांची हातभट्टी दारू अड्यावर धाड

यवतमाळ ग्रामीण पोलीसांची हातभट्टी दारू अड्यावर धाड

ग्रामीण पोलिसांची अवैद्यरित्या चालणाऱ्या गावरान हातभट्टी मोहा फुलाच्या दारूवर कारवाई दोन कारवाई मध्ये 99 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आला आज ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथील ठाणेदार किशोर जुनघरे यांना प्राप्त गुप्त माहितीवरून ग्राम खरोला येथील शेत शिवारात पोलिसांनी साध्या वेषात जंगलात असलेल्या हातभट्टीवर कारवाई केली सदर कारवाई दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आले ग्राम खरोला येथील मुकेश रामपाल उंबरे वय 35 वर्ष व रामू शामराव ठाकरे वय 45 वर्ष हे अवैधरित्या मोहामास सडव्याची हातभट्टी सुरू करून त्यातून गावरान हातभट्टी चालवून दारूचे गाळप करताना आढळल्याने दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले तसेच एकूण 60 पिप मोहामास सडवा ८० लिटर गावरान हातभट्टीची फटका दारू व इतर साहित्य पोलिसांनी नष्ट केली, सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे,पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे, ज्ञानेश्वर मातकर , संदीप मेहत्रे, सचिन तंबाके, सचिन पदकमवार चालक अविनाश वाघाडे यांनी केली असून आरोपिवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे..

Copyright ©