यवतमाळ सामाजिक

लेट अल्ताफ अली काझी प्राथमिक इंग्लीश मिडीयम स्कूल रुई वाई येथे दहीहंडी उत्सवात.

लेट अल्ताफ अली काझी प्राथमिक इंग्लीश मिडीयम स्कूल रुई वाई येथे दहीहंडी उत्सवात.

लेट अल्ताफ अली काझी प्राथमिक इंग्लीश मिडीयम स्कूल रुई वाई येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुलनाज ताई होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी सर,निता ताई केळकर, अश्विनी ताई ढेकळे,निता ताई ठाकरे,ज्येष्ठ मधून वंदना काकू मजेठीय्या हे होत्या तर सर्व प्रथम फोटोंचे पूजन करण्यात आले.त्यानंतर स्वागत समारंभ झाला नंतर नृत्य स्पर्धेस .सर्वप्रथम मैया यशोदा ये तेरा कनैया या गीताने सुरुवात होताच टाळ्यांचा गजर झाला या मध्ये सहभागी स्पर्धक संस्कृती ठाकरे, अंशरा शेख,भूमिका गोंधळेकर यांनी सहभाग नोंदविला.त्या नंतर स्पर्धात्मक नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षक आणि पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून सोडले होते.या मध्ये जवळपास ५० विद्यार्थी राधा आणि कृष्णा चा वेश परिधान करून आले होते त्या मध्ये रुद्र ठाकरे,दर्शन अत्राम,तेजस जूनघरे,निकुंज कडूकार,रेहान सैयद,तेजस गुंटेवर, साई केळकर,समर्थ केळकर,वंश गारोडी,सक्षम बहाळे, अश्मिरा शेख,आरोही जोगे, मृणाली ढेकळे,श्रद्धा जाधव, स्वरीत जवके,जयेश मेशराम,युवराज जैस्वाल, रीधी माजेठीया,प्रेम बहाले,महिरा शेख, अम्मार सैयद,जैन काझी,नुमन काझी,जान्हवी जोगे, शोर्य धाईस्कर तसेच असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.गोविंदा आला रे आला या गाण्याने गोविंदा पथकाने नृत्य सादर करून रुद्र ठाकरे यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका मयुरी रेनापूरकर यांनी केले,हा कार्यक्रम यशस्वी पने पार पाडण्यासाठी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी ,सहाय्यक शिक्षिका मयुरी रेनापुरकर, सहाय्यक शिक्षक नितेश डोकडे ,सहाय्यक शिक्षिका कल्याणी करपते,सहाय्यक शिक्षिका सहाय्यक शिक्षिका नाजमिन बेग, कर्मचारी संध्याताई मोहले, राजिक शेख, गजु भाऊ गुंठेवार,बाबू धैसकर यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©