यवतमाळ सामाजिक

यावर्षी यवतमाळ न.प. चा पोळा सण समता मैदानावर भरणार

यावर्षी यवतमाळ न.प. चा पोळा सण समता मैदानावर भरणार

विजेत्यांना मिळणार त्रेचाळीस हजार रुपयांची गुणानुक्रमित पारितोषिके!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत या वर्षीच्या पोळा सणाच्या निमित्ताने यवतमाळ नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आयोजित केला जाणारा पोळा उत्सव, स्थानिक समता मैदान (पोष्टल ग्राउंड) येथे बैलपोळा स्पर्धेच्या रुपाने संपन्न होणार आहे. स्पर्धेच्या नियमानुसार निवड होणाऱ्या सर्वोत्तम बैलजोडी मालक शेतकऱ्यांना गुणानुक्रमे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच स्पर्धेत सहभागी सर्व बैलजोडी धारकांना धोतर, शेला- नारळ देउन सन्मानित करण्यात येणार आहे.
२६ लाईन मेनरोड बाजार पेठ येथे पोळ्याच्या निमित्याने लावले जाणाऱ्या दुकानांची संख्या व नागरिकांची ये-जा लक्षात घेता यावर्षी समता मैदान येथे पोळ्याचा उत्सव भरविण्यात येणार आहे. यवतमाळ शहर व परिसरातुन येणाऱ्या शेकडो बैलजोड्यांमधिल सर्वोत्कृष्ट बैलजोडीची निवड करण्यासाठी परिक्षक मंडळ तयार करण्यात येणार असुन त्या मंडळात तज्ञ शेतकरी, पशु वैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभागचे तज्ञ व शेती अभ्यासकाचा समावेश राहील.
विजेता बैलजोडीला प्रथम क्रमांक पंधरा हजार, द्वितीय क्रमांक अकरा हजार, तृतीय क्रमांक सात हजार व प्रोत्साहनपर बक्षिस म्हणुन निवड झालेल्या ५ बैलजोडीला प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे एकूण त्रेचाळीस हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. या पोळा उत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ ऑगस्टला दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत समता मैदान (पोष्टल ग्राउंड) येथे आपल्या नावासह बैलजोडीची नोंदणी करणे अनिवार्य राहील. करीता इच्छुकांनी आपला सहभाग निश्चित करण्याचे दृष्टीने पोळा सणाचे दिवशी नियोजित वेळेत आपली नोंदणी करावी. असे आवाहन न.प. मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले आहे.

Copyright ©