Breaking News यवतमाळ

अल्बिनो कोब्रा सापला ला दिले जीवदान

अल्बिनो कोब्रा सापला ला दिले जीवदान

MH29 हेलपिंग हँड ने दुर्मिळ अल्बिनो साप नाग (specticla cobra) ला दिले जीवदान
हिवरी वनविभावनपरिक्षेत्रात HELPING HAND टीम ने पहिल्यांदाच या सापाची नोंद.

हिवरी / हिवरी परिसरातील हेलपिंग हँड च्या वन्यजीव रक्षकांना हिवरी गावामध्ये मनोज मुनेश्वर यांच्या राहत्या घरी एक साप असल्याची माहिती वनविभागाचे कर्मचारी निलेश शहारे
यांनी सर्पमित्र, जीवन तडसें, सूरज खडके,दीपक मिरासे यांना देताच हि
टीम घटनास्थळी पोहचून पाहणी केली तेव्हा सापाला पाहायला जमलेल्या गावकरी यांना जनजागृतीमाहिती देत सर्वांना बाजूला सारून पाहणी केली दुर्मिळ पांढर्या रंगाचा नाग जातीचा साप आढळुन आला.
दोन विटांच्या घरांच्या मध्ये असलेल्या छोट्याश्या गँपमध्ये हा साप जाऊन बसला होता.
व्यवस्तीत दोन तास चाललेल्या रेस्क्यू मध्ये अखेर सापाला सुरळीत बाहेर काढून वाचण्यास हेलपिंग हँडस टीम ला यश आले. त्यानंतर गावकऱ्यांना त्या साप बद्दल सविस्तर माहिती वन्यजीवनियम समजवून सांगितले.
दुर्मिळ पांढरारंग असलेल्या नागाला व्यवस्तीत पकडून हिवरी वनपरिक्षेत्रात रीतसर नोंद करण्यात आली. तसेच त्या बद्दल हिवरी वनपरिक्षेत्र मधील वनकर्मचारी व अधिकारी यांना माहिती देण्यात आली
या दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या सापाची लांबी जवळपास 3 फूट असून , हा एक विषारी जातीचा साप (नाग) असून त्याच्या शरीरातील मेलेणीन घटकाचे प्रमाण कमी अधिक झाल्यमुले त्यात हा बदल घडून आला ह्या कारणा मुळे प्राण्यांच्या शरीरावरील त्वचेचा रंग काळा किंवा पांढरा असा बदल दिसून येतो. पांढरा रंग असल्याने निसर्ग मध्ये त्याला इतर शिकार्यापासून लपण्यात मदत होत नाही ,उन्ह सहन होत नाही , रात्री च्या वेळेस अंधारात बाहेर पडून भक्ष्य शोधावे लागते
अशी माहिती MH29 हेलपिंग हँड चे संस्थापक व अध्यक्ष निलेशजी मेश्राम यांनी सांगितले.यावेळी त्या दुर्मीळ पांढऱ्या नागाला हिवरी वनपरिक्षेत्र अधिकारी नेहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले कुठेही वन्यजीव धोक्यात आढळून आल्यास वनविभाग टोल फ्री क्रं 1926 किंवा हेलपिंग हँडस टीम च्या सदस्यांना सम्पर्क करा असे आवाहन सुद्धा केले.

Copyright ©