Breaking News यवतमाळ सामाजिक

*22 अॉगस्टला यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा*

 

यवतमाळ : प्रतिनिधी

आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा‌ शाखा यवतमाळच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्या करीता आशा‌ व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांना घेऊन दिनांक 22 अॉगस्ट 2022 ला 11 वाजता श्रमशक्ती भवन आयुर्वेदिक दवाखाना यवतमाळ येथुन मोर्चाचे आयोजन केले आहे. आशांना थकित मानधन चार – चार ,पाच – पाच महीने मीळत नाही मा.संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभीयान यांनी दि.२२ जुलै २०२२ रोजी परिपत्रक काढून त्यात, राज्य आरोग्य सोसायटी , मुंबई उपलब्ध करून देण्यात आलेल्या ड्राइंग लीमीट मधुन आशांचा सन २०२१-२२ व २०२२ -२३ मधील थकित मोबदला अदा करण्यात यावा असे आदेश देवून सुध्दा मार्च महीण्या पासुन मानधन थकित आहे जिल्ह्यात अद्याप अंमलबजावणी झाली नाही. सतत आशा व गटप्रवर्तक महीलांना उपासमार सोसावी लागत आहे. वारंवार निवेदन देवून सुध्दा परिस्थीती जैसे थी आहे. शासनाचे लक्ष वेधण्या करीता आयटकच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मागण्या :- थकीत प्रोत्साहन भत्ते / मोबदला ताबोडतोब अदा करा व प्रोत्साहन भत्ते/ मानधन दर महीन्याच्या १ तारखेला द्या , आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन रू.25000/- द्या , सामाजीक सुरक्षा लागु करा, आरोग्य खात्यात कायम करा , राष्ट्रीय आरोग्य अभियानातील इतर कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाने गटप्रवर्तकांना समाविष्ट करा , आरोग्य खात्यातील 50% रीक्त जागा पातत्रेनुसार‌ आशा व गटप्रवर्तक मधुन भरा ह्या मुख्य मागण्यासह इतरही मागण्यांना घेऊन मोर्चा होणार आहे तरी आयटक आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या सर्व आशा व गटप्रवर्तक भगीनींनी मोठ्या संखेने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहण वंदना बोंडे , प्रणीता नगराळे, अनामीका कांबळे , सुनिता चव्हाण , आशा बडेराव , रश्मी वाघ , माधुरी पालरवार , कवीता जाधव ,वणीता चौधरी, दिपा झोबाळे, किरण कोलवते, विद्या लेंडे ,शीला पाटील,लता कलांद्रे ,निता सोयाम ,कुसूम गेडाम ,माया इंगोले ,ज्योत्स्ना दुधे ,राधाबाई लीखेकर , विजया आत्राम ,वणीता देठे, उज्वला पाझारे,ममता शिरसागर , अरूणा जुनगरे, किरण कांबळे ,लक्ष्मी सीडाम ,बबीता दोरशेट्टीवार ,सुजाता पुनेकार ,निर्मला मन्ने ,बबीता कुळसंगे ,साधना भगत , माया ठमके ,सीमा जाधव ,जया सुकळकर , बेबी चव्हाण , कांता खरवडे ,विजेता शेखावत ,शोभा राहुलवाड ,सुशीला आडे, कौशल्या राठोड ,सुजाता बरडे, विजया तायडे, बेबी भारती ,संगीता अवघन, शोभा नागोशे, राखी पवार ,गीता जाधव ,चंचल केदार ,जना तांभारे ,शीला भगत ,बबीता चिंचोले ,ज्योती भेंडे ,वंदना लोणारे ,निशा इंगोले ,माला इंगोले ,अंजना वानखडे, रंजना राऊत , संगीता ढेरे ,रंजना वानखडे ,मंगला रांखुडे ,शबाना शेख,रविना मुनेश्वर,दिवाकर नागपुरे यांनी केले आहे

Copyright ©