यवतमाळ सामाजिक

भगवान् श्रीकृष्ण प्रभूच्या शोभा यात्रेने पुसद्करांचे लक्ष वेधले

भगवान् श्रीकृष्ण प्रभूच्या शोभा यात्रेने पुसद्करांचे लक्ष वेधले

गवळी समाजाचे दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्ण प्रभूचा पुसद येथे प्रथमच भव्य दिव्य जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला या शोभा यात्रेत समस्त गवळी समाज बांधवांनी लहाण्या पासून तर वृद्ध , महिला एकत्रित येऊन शोभा यात्रेत भजन,आरती,प्रभूच्या आठवणीना उजाळा देणारे देखाव्याचे सादरीकरण करीत शोभा यात्रा काढण्यात आली ठीक ठिकाणी पुजनही करण्यात आले,यात समस्त समाज बांधवांचा प्रमुख सहभाग होता,या मध्ये वारकरी, विशेष भाव गीते,लोक गीते, व प्रभूच्या रथानी लक्ष वेधून घेतले होते भगवान श्रीकृष्ण यांच्या जय घोषानी पुसद नगरी दुमदुमली अनेकांनी या शोभा यात्रेची प्रशंसा करण्यात आली. या जन्मोस्टमीचे आयोजन श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद, च्या वतीने करण्यात आले

Copyright ©