यवतमाळ सामाजिक

कोठारी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दहीहांडी उत्साहात

कोठारी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दहीहांडी उत्साहात

शंकरलाल कोठारी विद्या मंदिर व गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल समर्थवाडी यवतमाळ येथे कॄष्ण जन्माष्टमी निमित्त दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी मा. माधुरी मडावी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा न.प.विरोधी पक्षनेते मा.चंद्रशेखर चौधरी, शहर सरचिटणीस मा.अजय किन्हीकर, संचालिका – अर्चना कोठारी,प्राचार्य – विजय विसपुते,यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिहांडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे
आभार प्रदर्शन दुर्गा मिश्रा यांनी केले व कार्यक्रमा ला असंख्य पालक व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Copyright ©