Breaking News यवतमाळ

यवतमाळ ग्रामीण पोलिसांची गुटख्या तस्कऱ्यावर कारवाई

यवतमाळ ग्रामीण पोलिसांची गुटख्या तस्कऱ्यावर कारवाई

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुटख्याची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पांढरी गावाजवळ नाका बंदी करून घाटंजी येथून येणारे चार चाकी वाहन क्र. एम एच ०१, बी एफ,५२९९ हि डस्टर कंपनीचे वाहन अडून तपासणी करण्यात आली
या वाहनात 48 भरलेले कट्टे पोलिसांना मिळून आले यामध्ये सुगंधित तंबाखू राजनिवास याची किंमत अंदाजे एक लाख 44 हजार

अशी असून सदर वाहनातील चालक यांचे नाव विचारले असता मनीष राजकुमार हेमणानी वय 34 वर्ष राहणार पळसवाडी सिंधी कॅम्प व सोबत असलेले नितीन प्रकाश हेमनानी वय 26 वर्ष राहणार पळसवाडी सिंधी कॅम्प यवतमाळ दोन्ही व्यक्ती सदर मालाबाबत विचारणा केली असता सदर सुगंधित राज निवास पान मसाला सुपारी पुढे असल्याचे सांगितल्याने सुगंधित पान मसाला नावाचे सुगंधी सुपारी पुढे असलेली एकूण 48 कट्टे चार चाकी डस्टर कंपनीची सिल्वर रंगाचे वाहनात तपासणी केली असता आढळून आले तर एक ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण सहा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला महाराष्ट्र प्रतिबंधित असलेल्या सुगंधी सुपारीची वाहनद्वारे तस्करी करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलीसानी औषधी प्रशासन याना पत्रव्यवहार करून गुन्हा दाखल केला व दोघानाही अटक केली
असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर भुजबळ पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे उपविभागी पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनखाली यवतमाळ ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले वाहतूक उपशाखा यवतमाळ उपनिरीक्षक अमोल ढोकणे अमित राठोड संजय राठोड सचिन पातंमवार यांनी हि कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे

Copyright ©