यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथे हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी

सावळी सदोबा येथे हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी

सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे परिसरातील बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली,यावेळी वसंतरावजी नाईक यांच्या तेल चित्राला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले,यावेळी उपस्थित,डॉ.रामचरण चव्हाण,प्रकाश भाऊ राठोड,नुनेश्वर आडे,रामराव राठोड,विठ्ठल नाईक,रामसिंग जाधव,अविनाश चव्हाण, प्रल्हाद चव्हाण,दिलीप राठोड,सुरेश राठोड,कृष्णा चव्हाणसह परिसरातील बहुतांश नागरिक उपस्थित होते.

Copyright ©