Breaking News यवतमाळ

मंगरूळ परिसर मध्ये खंडाळा येथील युवकाचा मृत्यू देह आढळला

मंगरूळ परिसर मध्ये खंडाळा येथील युवकाचा मृत्यू देह आढळला

मंगरूळ ( का.)परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गा ला लागून असलेल्या जंगलामध्ये युवकाचा मृत्यू देह आढळून आले यामध्ये युवकाच्या गळाला गळफास लावून आत्महत्याच बनावट दिसू लागले यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मंगरूळ परिसरात खंडाळा येथील युवक अवधूत सुभाष बर्वे वय 36 यांचा मृत्यू देह आढळून आले आत्महत्या की हत्या याविषयी चर्चा ला उधाण आले अवधूत सुभाष बर्वे व 36 हा यवतमाळ येथील विठ्ठलवाडी परिसरात राहतो त्याचे मुळ गाव खंडाळा असून तो गावी आला होता आणि परत यवतमाळ येथे रस्त्याने जात असताना त्यांनी मंगरूळ परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला जंगलाजवळ येऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी आत्महत्या की हत्या याविषयी संशय बळवला कारण युवकाच्या मुखातून रक्त वाहत असल्यास दिसून आले ही घटना सकाळी आठ वाजता घडल्याचे समजत आहे अधिक तपास ग्रामीण पोलीस चे बीट जमादार बावणे करीत आहे याविषयी अवधूत सुभाष बर्वे यांच्या मागे पत्नी मुलगी व आई वडील आहे

Copyright ©