यवतमाळ सामाजिक

प्रमुख न्याय दंडाधिकारी बाल न्याय मंडळ मा. न्या. श्रीमती सुप्रिया लाड यांचे हस्ते झेडावंदन संपन्न

प्रमुख न्याय दंडाधिकारी बाल न्याय मंडळ मा. न्या. श्रीमती सुप्रिया लाड यांचे हस्ते झेडावंदन संपन्न

महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय निरिक्षणगृह बालगृह यवतमाळ येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रमुख न्याय दंडाधिकारी बाल न्याय मंडळ मा. न्या. श्रीमती सुप्रिया वि. लाड यांचे हस्ते श्रीमती ज्योती कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,  वासुदेव डायरे अध्यक्ष, बाल कल्याण समिती यांचे प्रमुख उपस्थितीत झेडावंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. झेडा वंदन कार्यक्रमानंतर मा. न्या. सुब्रमण्यम साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा न्यायालय यवतमाळ यांनी संस्थेस भेट दिली व संस्थेतील विधी संघर्ष ग्रस्त व काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांशी त्याचे समवेत पालकांसारखे खाली बसून त्यांच्याशी हस्तादोलन करून त्यांना प्रोत्साहनपर गोष्टी सांगितल्या, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी, उचित धेय्य गाठण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बालकांनी काढलेल्या चित्राचे, एन. सी. सी. मध्ये राज्य स्तरावर निवड झालेल्या २ बालकांचे कौतुक केले, व त्यांना यापुढे काही मदत लागल्यास संपर्क करावा. त्यांचे मनोबल उचावण्यासाठी मार्गदर्शन केले प्रवेशितांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतावर समुहनृत्य सादरीकरण, चित्रकला बघून बालकाचे कौतुक केले.
बालकांना वेळप्रसंगी कोणतीही मदत लागल्यास संपर्क करावा. बालगृहातील प्रवेशितांना शाळेत कशाने जातात असे विचारले असता त्यांना शाळेत जाण्या करीता सायकल अथवा कोणतेही वाहन नसल्याचे प्रवेशितांनी सागितले तेव्हा शाळेत जाण्याकरीता लोकसहभागातून सायकल उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले असता बाल कल्याण समिती सदस्य  अनिल गायकवाड, यांनी बाल कल्याण समितीच्या माध्यमातून सर्वांना सायकल मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी समाज माध्यमाद्वारे घरी पडून असलेल्या जुन्या वापरण्यायोग्य सायकल अनाथ, निराधार, निराश्रित ( काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ) बालकांसाठी मिळवून देण्याची जबाबदारी घेतली. संस्थेस स्वयंपाका करीता इंडक्शन शेगडी आवश्यक असल्याने त्याचे वतीने देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बालगृहा तील प्रवेशितांनी देशभक्तीपर समूहगीत गायन, समुहनृत्य सादरिकरण केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू,  वासुदेव डायरे अध्यक्ष, बाल कल्याण समिती, बाल कल्याण समिती सदस्य अनिल गायकवाड, अॅड. प्राची निलावार, श्रीमती वनिता शिरफुले, अॅड. लीना आदे, बाल न्याय मंडळ सदस्य राजू भगत, अॅड. काजल कावरे, परीविक्षा अधिकारी रवींद्र गजभिये, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, स्वप्नील ढोकणे, बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी, मीनल जगताप, अतुल सहारे सखी वन स्टॉप सेंटर कर्मचारी, वर्ग उपस्थित होते.
निरिक्षणगृह/बालगृहाचे अधिक्षक, गजानन जुमळे, परीविक्षा अधिकारी, राजू गौरकार, समुपदेशिका पूजा राठोड, शिक्षक संजय मोटे, लिपिक सुनील हारगुडे, काळजी वाहक अविनाश राऊत, आकाश खांदवे, मंगेश वाघाडे, प्रतिक जुमळे, आंनद पवार, कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. या प्रसंगी निरीक्षण गृह /बालगृहातील सर्व प्रवेशित उपस्थित होते.

Copyright ©