यवतमाळ सामाजिक

खासदार धानोरकर यांच्या आश्वासनाने मुस्लिम बांधवांच्या उपोषणाची सांगता

घाटंजी प्रतिनिधी अमोल नडपेलवार

खासदार धानोरकर यांच्या आश्वासनाने मुस्लिम बांधवांच्या उपोषणाची सांगता

घाटंजी शहरात स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटूनही उर्दू शाळेची स्वतंत्र इमारत नाही, शाळेला विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक नाही, या दोन्हीही मागण्याची प्रशासनाने तात्काळ पुर्तता करावी, या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राजवळ पारवा पाँइंट जवळ 15 आगस्ट रोजी मुस्लिम समुदाया तर्फे एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन म्हणून उपोषण सुरू केले. डॉ बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. या विषयीची माहिती कांग्रेचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांना मिळाली, त्यांनी मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन खासदार श्री बाळु धानोरकर यांची भेट घेतली, श्री धानोरकर यांनी उर्दू शाळेच्या इमारती साठी 60 लाख रुपये मंजूर करीत असल्या बाबत सांगितले या बाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री अमोल माळकर यांना सुचित केले. एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धडाक्याने साजरा होत असताना मुस्लिम बांधवांच्या मुलांसाठी स्वतंत्र उर्दू शाळेची इमारत नसावी हे दुर्दैवी आहे. लवकरच मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी पालकमंत्र्याची भेट घेणार असून त्यांनाही निधीची मागणी करणार आहेत. भविष्यात उर्दू शाळेच्या स्वतंत्र इमारतीचा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व श्री अ. हाफिज, अध्यक्ष अंजुमन इस्लाम कमेटी घाटंजी, श्री मो. इकबाल अध्यक्ष मदिना मदरसा घाटंजी, सय्यद रफीक बाबु माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी, श्री कज्जुम कुरेशी उपाध्यक्ष तालुका पत्रकार संघटना घाटंजी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले, विशेष म्हणजे या वेळी प्रत्येक मुस्लिम तरुणांच्या हातात तिरंगी झेंडा डौलाने फडकत होता. या वेळी मुस्लिम समुदायातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Copyright ©