यवतमाळ सामाजिक

कराटे स्पर्धेत यवतमाळच्या खेळाडूचे घवघवीत यश

कराटे स्पर्धेत यवतमाळच्या खेळाडूचे घवघवीत यश

दी यवतमाळ अम्युचर कराटे डो असोसिएशन यवतमाळ तर्फे आयोजित यवतमाळ डिस्ट्रिक्ट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे खेळाडू यांनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून पदके पटकावली त्यात श्रवण निकेश कडूकार
ओम राहुल कडूकार, पियुष नितीन राठोड,आदर्श प्रदीप जाधव, हितेश रविंद्र महानुर, कु. स्वरा संदीप गोफणे, कु.अदिबा मोबिन चव्हाण व हेमंत गणेश उईके यांनी आपला उत्कृष्ट प्रदर्शन दाखवुन प्रथम क्रमांक प्राप्त केले तसेच कु.ईशिका विनोद मुदलीयार, कु.आलिया मोबिन चव्हाण,कौशल नंदकिशोर येन्नरवार, युवान प्रशांत जयस्वाल, कु.अदिती जयानंद ईसाळकर, चंदन ज्ञानेश्वर राऊत यांनी रजत पदक तसेच कु.आदीश्री मोहन तेलंग यांनी कांस्य पदक मिळविले. व प्रथमेश सुभाष काकडे, यश कृषभ दरवेकर यांनी आपला सहभाग नोंदविला. या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक श्री. रोहित केवारकर, श्री. अजित मिश्रा, हेमंत उईके व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), श्री. ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े, रविन्द्र महानुर, विनोद खोडकुंबे व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©