यवतमाळ सामाजिक

अधिष्ठाता यांचे हस्ते “विश्वात्मक औदार्य” पुस्तकाचे प्रकाशन

अधिष्ठाता यांचे हस्ते “विश्वात्मक औदार्य” पुस्तकाचे प्रकाशन

प्रफुल भोयर यांनी लिहिली शासकीय रुग्णालयाची गौरवगाथा

यवतमाळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त 75 व्या स्वातंत्र्यदिनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ चे सन्माननीय अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्या हस्ते प्रफुल भोयर लिखित विश्वात्मक औदार्य-रक्तपेढी एक वरदान या पुस्तकाचे प्रकाशन रुग्णालयाच्या प्रांगणात थाटात पार पडले. यावेळी अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, प्रशासकीय अधिकारी . झिंजे, रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक आशिष खडसे तसेच शासकीय रुग्णालयाचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते. मानवी मूल्याच्या जोपासने बरोबरच आचरणात आणण्यासाठी रक्तदान मानवी जीवनात कशी भूमिका बजावते, रक्तदानाचे शारीरिक फायदे, मनावर होणारा सकारात्मक बदल, एकंदरीत संपूर्ण मानवतेला दानाची संस्कृती आणि परंपरा जपायला शिकवणारे पुस्तक, नाते जपायला लावणारे, माणुसकीने हृदयाला पाझर फोडणारे, निरपेक्ष भावनेने मदतीचा हात द्यायला सांगणारे पुस्तक आहे.यावेळी मान्यवरांनी पुस्तकाचं यश सांगून प्रफुल भोयर यांच्या निरपेक्ष कार्याचे कौतुक केले.
रक्तदानाची महती वर्णावी तेवढी कमीच आहे. आजच्या घडीला मानवी मूल्य कशी जोपासावी कुणालाही समजवावे लागत नाही. जीवाचे महत्व समजावून सांगणारे दान अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे रक्तदान.
रक्तविर धाग्याप्रमाणे माणसं जोडतात आणि नातं घट्ट करतात. महत्वाचे म्हणजे आपत्ती वेळी रक्ताविना जीव जाणाऱ्या रुग्णाचे प्राण वाचवितात. रुग्णाच्या मनात आयुष्याची नवी उमेद जागी करुन रक्तविर रुग्णाला जगण्याचा रंग दाखवते.
गरजूंना जीवनदान देण्याच्या मुख्य हेतूने पेटविलेल्या दिव्य कुंडात आज लाखोंनी सहभाग नोंदविला आहे. दररोज लागणाऱ्या रक्ताची गरज रक्तविर आपल्या परीने रक्त देऊन रुग्णासाठी जीवनदाता ठरत आहे.
रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हणतात कारण रक्तदानाला कुठलाही पर्याय उपलब्ध झाला नाही. याचे भान सर्वानीच ठेवायला हवे. रक्तासाठी माणुस इतर माणसांवर अवलंबून आहे म्हणून रक्तदान करणे महत्वाचे आहे. त्यासाठी समाजात सर्वव्यापी रक्तदानाची जनजागृती व्हावी, या हेतूचा झेंडा घेऊन निघणाऱ्या प्रफुल भोयर यांची जनजागृती लाखो युवकांना रक्तदाते बनवत आहे.
प्रफुल भोयर यांच्या कार्याला व त्यांच्या स्वयंलिखित रक्तदान जनजागृती विषयक लिहिलेल्या “विश्वात्मक औदार्य रक्तपेढी एक वरदान” या श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रक्तपेढी यवतमाळ यांच्या कार्याचा उल्लेख असलेली गौरवगाथा तसेच जनजागृतीपर असलेल्या पुस्तकाला प्रफुल यांनी महाराष्ट्र समृद्ध व संपन्न करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या सर्व सजग व सुजाण नागरिकांना समर्पित केले आहे.
भगत सिंह कोश्यारी( राज्यपाल महाराष्ट्र राज्य ), मा. बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री, राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई चे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात, माननीय आमदार मदन येरावार, कालिंदाताई पवार, तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, पोलीस कल्याण शाखेचे पी. व्ही. फाडे, जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, नितीन मिर्झापुरे, बिपीन चौधरी तसेच प्रत्यक्ष रक्तदात्यांच्या शुभेच्छा सह प्रफुल्ल च्या कार्याला सर्वांचा पाठिंबा आहे.
प्रफुल भोयर यांनी रक्तदानाच्याजनजागृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आज रोजच्या लागणाऱ्या रक्ताची गरज पाहता शेकडोच्या संख्येने रक्तदाते तयार ठेवावे लागते, असे प्रफुल भोयर सांगतो.

Copyright ©