यवतमाळ सामाजिक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बोथ बोडण येथे सत्कार सोहळा.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बोथ बोडण येथे सत्कार सोहळा.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माझं गाव फाऊंडेशन, बोथ बोडणच्या वतीने भूमिपुत्रांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. सदर कार्यक्रमात गावातील सरकारी, शासकीय – निमशासकीय,खाजगी नोकरी, व्यवसाय,अध्यात्म, व्यसनमुक्ती,पौरोहित्य,मराठी – बंजारा भजन, माजी खेळाडू व ज्यांनी स्वतः सह गावाचे नाव लौकिक केले अशा एकूण 48 लोकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
गावातील तिन्ही नाईक, कारभारी, ज्येष्ठ नागरिक, माजी-आजी ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य गण, पोलीस पाटील, तंटामुक्ती पदाधिकारी, सर्व सन्मानित शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती,सचिव,तलाठी, आरोग्य विभाग कर्मचारी, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ग्रा.पं.कर्मचारी,कोतवाल,गावातील बचत गटांच्या महील्या, महिला मंडळी, युवक मंडळी हजर होते. ह्यात विशेष भर पडली ती भारतीय सेनेचे जवान *मा.गोकुळभाऊ राठोड* यांच्या उपस्थिती मुळे. त्यांच्यामुळे कार्यक्रमास व गावात खऱ्या अर्थाने देशभक्तीचा रंग व वलय निर्माण झालं. त्यांनी माझं गाव फाउंडेशनच्या पुढील कार्यक्रम व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला
गावातील नागरिक,महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझं गाव फाऊंडेशन येणाऱ्या काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असणार याची ग्वाही देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझं गाव फाउंडेशनचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले.
सूत्र संचालन उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक मा. श्री. रणनवरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षण मुख्याध्यापक मा. श्री. गावंडे सर यांनी केले.

Copyright ©