यवतमाळ सामाजिक

व्याख्यानमाला व शालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा संपन्न

व्याख्यानमाला व शालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा संपन्न

यवतमाळ:- श्री गुरुदेव सेवा मंडळ, जिल्हा प्रचार समिती मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ व कै. बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने ” स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ ” पर्यंत नामवंत अभ्यासकांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
दि ९ ऑगस्टला ‘ क्रांतिदिनी ‘ भारतीय हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दि ११ ऑगस्टला सामुदायिक प्रार्थनेनंतर प्रा. तोष्णा मोखडे यांनी ” स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर चळवळीत महिलांचा सहभाग ” या विषयावर व्याख्यान पुष्प ओवले.
दि १२ ऑगस्टला ललितकुमार व-हाडे, निवासी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी ” स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रसंतांचे योगदान व आजची सामाजिक स्थिती ” या विषय विचार सुमनाने मालेची सुंदर गुंफन केली.
दि.१३ ऑगस्टला प्रा. डॉ. प्रवीण देशमुख ” भारतीय इतिहासातील बदलते रंग एक अवलोकन ” या विचार पुष्पाने श्रोत्यांना मुग्ध केले.
१४ ऑगस्टला डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांनी ” स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रसंतांचे योगदान व गांधीवाद “या विषयानुषंगाने विचार पुष्प गुंफून सुंदर माला देशाला समर्पित केली.
१५ ऑगस्टला ” आंतर शालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे ” आयोजन करण्यात आले होते.
शहरातील वीस विदयालयांनी सहभाग नोंदवून अप्रतिम सादरीकरण करून रसिकांना एक मेजवानीच दिली.
डॉ. ठाकरे , मुंबई यांचे तर्फे स्व.पंचफुलाबाई ठाकरे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ रोख २५०१ ₹ प्रथम क्रमांकाचे बक्षीस व सन्मानचिन्ह स्कूल ऑफ स्काॅलर्स इंग्लिश मिडीयम स्कूल, यवतमाळ, यांना प्रदान करण्यात आले. डॉ. चेतन दरणे, दंतचिकित्सक , यवतमाळ यांचे तर्फे २००१₹ रोख व सन्मानचिन्ह द्वितीय बक्षीस विवेकानंद विद्यालय, यवतमाळ, यांना देण्यात आले. डॉ. अनिल कडू, होमिओ क्लिनिक, यवतमाळ यांचेकडून १५०१₹ रोख व सन्मानचिन्ह तृतीय बक्षीस सत्य साई इंग्लिश मिडीयम स्कूल, यवतमाळ, यांच्या वाट्याला आले. अनंतराव कटकोजवार घाटंजी यांचे तर्फे १००१₹ रोख व सन्मानचिन्ह चतुर्थ बक्षीस सुसंस्कार विद्या मंदिर, यवतमाळ यांना प्रदान करण्यात आले.
स्व. रामजी चन्नावार विद्यालय व सेंट अलॉयसिस इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच इतर शाळांना प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
अमोलभाऊ बोदडे, शाखा व्यवस्थापक, कै. बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था , यवतमाळ यांचे हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विनायक बोदडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
डॉ. कुडमेथे सर व डॉ. अंजू फूलझेले मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भुयार, किरपानताई, डॉ अनंतकुमार सूर्यकार, अशोक गेडाम, प्रभाकर ढोले, रामदास घंगाळे, तुकाराम राऊत, बजरंग शेंडे, नामदेव राजुरकर, रेणूराव सालोडकर, शिरे मामा, रमेश नारनवरे , दीपक कवळकर, प्रकाश कुमरे, बोदडेताई, गिरीताई, उघडेताई, चकुलेताई आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. अनंतकुमार सूर्यकार यांनी करून राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Copyright ©