यवतमाळ सामाजिक

यवतमाळ तालुक्यात पाऊसच नाही,शासनाचा जावाई शोध

यवतमाळ तालुक्यात पाऊसच नाही,शासनाचा जावाई शोध

यवतमाळ तालुक्यातील पाऊसच आला नसल्याचा जावाई शोध लावल्याचे दिसून येत आहे यवतमाळ तालुक्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांनी तीबार पेरणी करुन हि पीक आले नाही तर अती वृष्टी मधून यवतमाळ तालुक्याला वगळण्यात आले असल्याचा शाशनाने जावाई शोध लावल्याचे दिसून येत आहे, त्या मुळे शेतकऱ्यांन मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवरी रुई हे सर्कल तर अनेक वर्षापासून कोणत्याच सानुग्रह,म्हणा, ओला दुष्काळ किंव्हा कोरडा दुष्काळ या मध्ये तर नाहीच पीक विमा सुद्धा मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झालेला आहे, यवतमाळ तालुक्याला न्याय देणारे कुणी आहे की नाही असा सवाल सर्व सामान्य शेतकऱ्यानं कडून विचारण्यात येत आहे शेकडो हेक्टर वरील पिके निकामी झाली तीबार पेरणी करूनही शेतात पीक दिसत नाही अनेकांच्या जमिनी चीबडल्या तर काहींच्या वाहून गेल्या इकडे मात्र कुणीही फिरकले नसल्याने हि दुर्दैवी बाब म्हणावी लागेल या बाबत शेतकऱ्यानं मध्ये खंत निर्माण होत आहे या संदर्भात कुणीही लोकप्रतिनिधी पुढे यायला तयार नसल्याने शेतकरी हवाल दिलं झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर तर वाढलेच पीक जर झाले नाही तर कर्ज कशाने फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण पीक तर होणारच नाही हि काळया दगडावरील रेघ आहे आणि शाशना ने अती वृष्टी मधून चक्क यवतमाळ तालुक्यालाच वगळल्याने शेतकरी संतप्त झाला असून आंदोलनाच्या पवित्र्यात आला आहे. या बाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे

Copyright ©