यवतमाळ सामाजिक

स्वातंत्र्य दिनानिमित्त चिखलवर्धा ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण

घाटंजी प्रतिनिधि अमोल नडपेलवार

स्वातंत्र्य दिनानिमित्त चिखलवर्धा ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण

घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिखलवर्धा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले होते वृक्षारोपण रोपन करून त्याचे संवर्धन करणे हे आजच्या काळाची गरज आहे यामुळे चिखलवर्धा ग्रामपंचायत चे उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी ग्रामपंचायत परीसरातील खुल्या जागेवर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले होते वृक्षारोपण करतेवेळी सरपंच वर्षा कनाके उपसरपंच आकाश नडपेलवार ग्रामपंचायत सदस्य जैतुजी मेश्राम अर्जुन जाधव संभू पेंदोर कु. किरण कुमरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास नेवारे सचिव पि. एम. भगत चिखलवर्धा तलाठी राज गरूडे युवक काँग्रेस चे अबरार पटेल गणेश कुमरे मो. शे. अशफाक श्रीराम बोटरे सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Copyright ©