यवतमाळ सामाजिक

टी १ अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब यांनी दिले अजगराला जीवदान.

टी १ अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब यांनी दिले अजगराला जीवदान.

टी १ अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब. या नावाने संस्था काही काळापासून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणेच त्यांना असाच एक फोन कृष्णा सचिन इंगोले राहणार तरोडा यांचा फोन आला असता त्यांनी गावामध्ये साप दिसल्याची त्यांनी माहिती दिली तसेच सर्पमित्र निलेश जोगे , शिवम जोगे , दर्शन जोगे ,अक्षय सयाम,मिलिंद वणवे,हर्षल बनकर, स्वप्निल जोगे, लखन कोडापे यांना दिली.याची तातडीने दाखल घेत विलंब न करता मंगरूळ येथील टी १ अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब मधील सदस्य तिथे जाऊन पाहणी केली असता. तिथे त्यांना अजगर या जातीचा साप तरोडा गावामध्ये दिसून आला. सापाची लांबी अंदाजे ८ ते ९ फूट असून १५ ते १७ किलो त्याचे वजन आहे त्याला अतिशय चपळाईने आपल्या ताब्यात घेतले व तेथील उपस्थित व्यक्तींना त्या सापाची माहिती दिली.टी १ अवणी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब मधील सदस्य व वनअधिकाऱ्याचा समक्ष त्या अजगराला वणात सोडण्यात आले.
माहिती :अजगर या सापाची अधिकतम लांबी . 760 से.मी. (24 फीट 11 इंच ) इतकी असते. रंग व आकार: – राखाडी किंवा फिकट तपकिरी गडद तपकिरी धाब्बे पोटाकडचा भाग पांढरा किंवा फिकट पिवळसर शरीर स्थूल खवले मऊ डोक्यावर कोणासारखी आकृती डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या. शेपटी आखूड
प्रजनन :- पाळापाचोळ्याचा ढीग करून मादी त्यात 20 ते 80 अंडी घालते. 90 ते 100 दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात.
वैशिष्टये:- निशाचर. जबड्याच्या पुढील टोकावर असलेल्या उष्णसवेदनाग्राहक खाचामुळे त्यांना भक्ष्य शोधण्यास मदत होते . भक्ष्याला तोंडाने पकडल्यावर शरीराला विळखा घालतो व आवळून गुदमरून मारतो मग भक्षाचा तोंडाकरून सुरुवात करून गिळतो मध्यम आकाराचा प्राणी पचवायला त्याला अंदाजे तीन आठवडे लागतात वन्यजीव स्वरंक्षण कायदा 1972 अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारी शेड्युल (1) मध्ये येतो. या बाबत प्रत्येकानी जागरूकता ठेऊन साप ओळखावा .

Copyright ©