यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

कळंब नगर पंचायत व तहसील कार्यालयाकडून तिरंगा जनजागृती रॅली.

कळंब नगर पंचायत व तहसील कार्यालयाकडून तिरंगा जनजागृती रॅली.

कळंब मध्ये तिरंगा जनजागृती रॅली

तिरंगा जनजागृती रॅली : कळंब नगर पंचायत व तहसील कार्यालयाकडून आयोजन

तिरंगा जनजागृती रॅलीत ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कळंब नगर पंचायत व तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत तिरंगा जनजागृती रॅलीत कळंब शहरातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ‘घरोघरीतिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियानाच्या जनजागृतीसाठी कळंब नगर पंचायत, तहसील कार्यालय यांच्यावतीने आयोजित तिरंगा जनजागृती रॅलीत श्री.चिंतामणी विद्यालय व शिवशक्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘तिरंगा जनजागृती रॅलीची सुरुवात शिवशक्ती विद्यालय पासून – राळेगाव चौफुली – पाण्याची टाकी कडून – गांधी चौक – नेहरू चौक – नगर पंचायत कार्यालय – तहसील कार्यालय – बस स्थानक – चिंतामणी मंदिर येथे जनजागृती रॅलीचा समारोप करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी रॅलीत देशभक्तीपर घोष वाक्यसंदेश फलक हातात घेत भारत माता की जय, वंदे मातरम्‌ अशा देशभक्तीपर घोषणा दिल्या.

रॅली मध्ये उपविभागीय अधिकारी मा.श्री. शैलेश काळे, तहसीलदार मा.डॉ. सुनिल चव्हाण, नायब तहसिलदार मा.श्री.राजेश वेटे, मुख्याधिकारी मा.श्री. नंदु परळकर, गटविकास अधिकारी मा.श्री. सुभाष मानकर, पोलिस निरीक्षक मा.श्री. अजित राठोड, प्रशासकिय अधिकारी मा.श्री. सुनिल मगर, शिवशक्ती विद्यालय मुख्याध्यापक मा.श्री. ज्ञानेश्वर मुरखे, श्री. चिंतामणी विद्यालय मुख्याध्यापक मा.श्री. सुनील राठोड, उपनगराध्यक्ष मा.श्री. आकाश कुटेमाटे, नगरसेवक कुशल बोकडे, माजी नगरसेवक अब्दुल अजीज तसेच इतर न.पं. व तहसील कार्यालय कर्मचारी, शिक्षक वृंद, राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. रॅलीत माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वसंतराव पुरके सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. रॅलीच्या समारोपाच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना घरावर तिरंगा झेंडा कसा लावावा, झेंड्याची लांबी- रुंदी किती असावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्या नागरिकांना झेंडे हवे असतील, त्यांनी नगर पंचायत द्वारा कळंब शहरात ४ राष्ट्रध्वज विक्री केंद्रावर फक्त २३ रूपये शुल्कात उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी मा.श्री.नंदु परळकर म्हणाले तसेच रॅली चालु असताना वाहतूक विस्कळित होऊ नये म्हणून पोलिस स्टेशन कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Copyright ©