यवतमाळ सामाजिक

शिष्यवृत्ती परीक्षेत स्नेहल पवार जिल्ह्यातून नववी

शिष्यवृत्ती परीक्षेत स्नेहल पवार जिल्ह्यातून नववी

सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा सारख्या अति दुर्गम व मागासलेल्या ग्रामीण भागातील मौजा माळेगांव या लहानश्या गावातील उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या,एका गरीब कुटुंबातून कु. स्नेहल सुकुमार पवार या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून जिल्ह्यातून ९ क्रमांक पटकाविला आहे,कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना, अतिशय जिद्दीने व मेहनतीने परिस्थितीवर मात करून आपल्या गावातील प्राथमिक शाळेच्या शिक्षक वृदाचं आणि आई-वडिलांचं नाव लौकिक केल्यामुळे सावळी सदोबा परीसरातु स्नेहलचं कौतुक केल्या जात आहे,आपल्याला मिळालेल्या यशाचा श्रेय स्नेहल आपल्या शिक्षक वृंदांना देतंय

Copyright ©