यवतमाळ सामाजिक

रुई येथील शाळेत रक्षाबंधन

रुई येथील शाळेत रक्षाबंधन

लेट अल्ताफ अली काझी प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा रुई (वाई ) येथे रक्षा बंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. लेट अल्ताफ अली काझी प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा ही रुई वाई या छोट्याशा गावात 2010 पासून अविरत सुरू आहे.आज रक्षा बंधन सन अवचित्त साधून या शाळेत पवित्र असा भाऊ बहिणीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात प्रामुख्याने शाळेतील विद्यार्थी मृणाली ढेकाळे,भूमिका गोंधळेकर, आरोही जोगे,संस्कृती ठाकरे,भूमिका गिरी, अनन्या जाधव,जान्हवी जोगे, स्वरा लोणकर,आरुषी राऊत,श्रद्धा जाधव,सुशांत मानकर,वेदांत राठोड, कुणाल जाधव, साई केळकर, सक्षम बहाळे,निकुंज कडूकार,यश राऊत,आर्यन खांदवे,रिधी मजेठीया भावेश तलांडे तसेच असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी, शाळेचे सहाय्यक शिक्षक नितेश डोकडे,सहायक शिक्षिका कल्याणी करपते, सहाय्यक शिक्षिका नाजमिन बेग ,शाळेच्या कर्मचारी संध्याताई मोहडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Copyright ©