यवतमाळ सामाजिक

दिग्रस मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

दिग्रस मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

प्रणीत मोरे मित्रमंडळाचा पुढाकार ; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार

शहरात मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्ययाचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि.१२ ऑगस्ट रोजी दिग्रस येथील प्रणित मोरे मित्र मंडळ कडून सकाळी ९ वाजता अभूतपूर्व भव्य अशा तिरंगा रॅलीचे आयोजण केले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दि.१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शासनाच्या हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होण्यासाठी हजारो नागरिकांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज लावण्यासाठी मोफत वितरित केले जाणार आहेत. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी बाईक रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाच्या प्रचारार्थ दि.१२ ऑगस्ट निघणाऱ्या तिरंगा रॅलीतुन जनजागृती व सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन सुरू होणारी तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करित छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे परत आल्यानंतर राष्ट्रगीताने याची सांगता होणार आहे. इतिहासातील ही सर्वांत मोठी रॅली राहणार असून त्यामध्ये विविध झाँकिया देखील सहभागी होणार आहे तसेच विद्यानिकेत शाळेचे लेझीम पथक या रॅलीचे विशेष आकर्षण असणार आहे.

यात शहरातील विविध भागांतून हर घर तिरंगा उपक्रमाचा प्रचार करण्यात येणार असून तिरंगा रॅली शहरातून जातांना विविध ठिकाणच्या शहीद स्मारकांजवळ स्वातंत्र्य लढ्यातील महामानवांना अभिवादन केले जाणार आहे. या रॅली मध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणावर युवक वर्गाचा समावेश असणार आहे, त्यामुळे या भव्य अशा तिरंगा रॅलीत सर्व दिग्रसकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रणित मोरे मित्र मंडळाकडून करण्यात येत आहे.

Copyright ©