यवतमाळ सामाजिक

शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारचे कपडे उतरवू

शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारचे कपडे उतरवू

अर्ध नग्न आंदोलनात शेतकरी नेत्यांचा इशारा

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतक-यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यवतमाळ जिल्हयात कापूस, सोयाबिन सह सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान आज पंचनामे न करता सरसकट मदत देण्याच्या मागणीसाठी यवतमाळात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. सरसकट मागणीचा निर्णय मान्य न केल्यास सरकारचे कपडे उतरवू असा इशारा शेतकरी नेते विनायक पाटील तसेच सिकंदर शहा यांनी याप्रसंगी दिला आहे.

गेल्या पंचविस दिवसापासून सुरु असलेला पाऊस थांबायला तयार नाही. या पावसामुळे शेतक-यांचा खरीप हंगाम पाण्यात गेला असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करण्याची मागणी शेतकरी वारकरी संघटनेच्या वतीने याआधीच करण्यात आली होती. सरकारने अजुनही ठोस कारवाई न केल्याने आज यवतमाळात शेतक-यांचा संताप अनावर झाला. स्थानिक आझाद मैदानातून शेतकरी नेते विनायक पाटील, सिकंदर शहा यांच्या नेत्रृत्वात अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. संततधार पावसामुळे संपुर्ण राज्यभरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पंचनामे करण्यापेक्षा सरसकट मदत देण्याची तसेच रोजगार हमी योजनेतून शेतमजुरांना मजुरी देण्याची मागणी विनायक पाटील तसेच सिकंदर शहा यांनी केली आहे. खरीप हंगाम पाण्यात गेल्याने गेल्या दोन महिण्यापासून राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु होत्या. अजुनही सरकार शेतक-यांच्या मागणीकडे गंभीरतेने बघायला तयार नाही. नदी तसेच नाल्याच्या काठावरीत शेती तर खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाची माती झाली आहे. त्यामुळे सरसकट मदतीची मागणी करण्यात आली असून सरकारचे कपडे उतरविण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात बाळू चव्हाण, बाळू विरुपकार, विलास सोमोटे, विलास राठोड, छगन राठोड, रुषीकेश पिंपळकर, केदार गायकी, दिपक मडसे इत्यादी शेतकरी सहभागी झाले होते.

नेत्यांच्या पैशाचा पंचनामा करु

संततधार पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परीस्थितीत सरकार मात्र पंचनामे करण्यात वेळ घालवित आहे. सर्वच शेतक-यांचे नुकसान झालेले असल्यामुळे सरसकट मदत देणे गरजेचे आहे. असे न झाल्यास सरकार स्थापनेसाठी पन्नास आमदारांनी किती पैसे घेतले याचा पंचनामा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.

Copyright ©