यवतमाळ सामाजिक

13 ऑगस्ट पासून सावळी सदोबा येथे विद्युत व पांदण रस्त्यासाठी आमरण उपोषण

सदोबा सावळी प्रतिनिधी असिफ खान

13 ऑगस्ट पासून सावळी सदोबा येथे विद्युत व पांदण रस्त्यासाठी आमरण उपोषण

सावळी सदोबा -आर्णि तालुक्यातील
सावळी सदोबा व परिसरातील 40 गावातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सततच्या विद्युतच्या लपंडावाने त्रस्त व हैराण झालेली आहे या भागात दिवसातून 50 वेळा विद्युत गेली नाही असा दिवस कधीच उजाडला नाही, कधी कधी तर दोन दोन दिवस विद्युत चा पताच नसतो,या भागातील विद्युतचा पुरवठा सुरळीत करावा याकरिता अनेक संघटना व राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने उपोषणे व निवेदने दिली परंतु सावळी सदोबा व परिसरातील विद्युतचा लपंडाव अद्याप कमी झालेला नाही.
विद्युत मंडळाचे या भागात अनेक पदे रिक्त असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर यांनी केला आहे,
विद्युतचा पुरवठा तातडीने सुरळीत सुरू न झाल्यास 13 ऑगष्ट शनिवार पासून सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर परिसरातील गावकऱ्यांच्यासह आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदन मुबारक तवर यांनी संबंधितांना दिले आहे,
तसेच सावळी सदोबापासून 7 किमी अंतरावरील शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेल्या झापरवाडी या गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जायला रस्ता नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, तेव्हा झापरवाडी येथील शेतकऱ्यांच्या सोयी व हिताकरिता पांदन रस्ता मंजूर करावा तसेच गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने तेथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो तर पावसाळ्यात अंत्यविधी कुठे करावा ?
हा गंभीर प्रश्न झापरवाडी येथील नागरिकापुढे उभा ठाकतो तेव्हा झापरवाडी येथील स्मशानभूमी करता पांदन रस्ता मंजूर करून मिळावा याबाबत वरिष्ठाकडे अनेक निवेदने, आंदोलने करून दोन्ही प्रश्न मार्गी न लागल्याने गावकऱ्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तवर यांच्याकडे आपली कैफियत,अडचण मांडली तेव्हा हे दोन्ही पांदण रस्ते 12 ऑगस्ट शुक्रवार पर्यंत मंजूर न झाल्यास 13 ऑगष्ट शनिवार पासून झापरवाडी येथील आदिवासी बांधवांसोबत आपण सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदन श्री. मुबारक तंवर यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ ,कार्यकारी अभियंता विद्युत मंडळ यवतमाळ,कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यवतमाळ ,उपविभागीय विद्युत मंडळ आर्णी , तहसीलदार आर्णी व ठाणेदार पारवा पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदनातून दिला आहे.

Copyright ©