यवतमाळ सामाजिक

आमदार संजय राठोड यांच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

आमदार संजय राठोड यांच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

– नेर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
यवतमाळ – गुणवत्ता असूनही परिस्थितीअभावी कोणाचेही शिक्षण थांबू नये, यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गरीब व गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा आमदार संजय राठोड यांनी केली.
नेर येथे गुरुवारी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रयत्न आणि परिश्रमातून अनेक विद्यार्थी स्वतःतील गुणवत्ता सिद्ध करतात. दहावी आणि बारावीची परीक्षा जीवनाला नवी दिशा देणारी असते. आज शैक्षणिक स्पर्धा प्रचंड वाढल्याने विद्यार्थ्यांवरील ताण तणावही वाढले आहेत. त्यातच अनेक गुणवंत विद्यार्थी इच्छा असूनही परिस्थितीअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांनी आता चिंता सोडून पुढील शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे व शिक्षण उत्सव साजरा करावा, यासाठी गरजू विद्यार्थ्यांना वैयक्तिक शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याचे आ. राठोड यांनी सांगितले. सध्या ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे, त्यात आणखी शंभर विद्यार्थ्यांची वाढ करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दहावी, बारावीतील यशानंतर थांबू नका, अभ्यासात सातत्य ठेवा, कायम नाविन्याचा ध्यास ठेवून पुढे जा, असा सल्ला यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. स्वतःला आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करून आई, वडील, कुटुंब, समाज आणि देशाची सेवा करा, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परमानंदजी अग्रवाल, कृउबासचे माजी सभापती भाऊराव ढवळ, नामदेवराव खोब्रागडे , गजाननराव भोकरे, मनोज नालहे, दीपक आडे, मधुमती चव्हान, समीर पाटील माहुरे, रमेशराव बुरांडे, भरत मसराम, वैशालीताई मासाळ, रश्मीताई पेठकर, अर्चनाताई इसळकर, नानाभाऊ पोहेकर भीमरावजी खोब्रागडे, शालिक गुल्हाने, शंभुजी नेवारे, सुजित कुंभारे, नितीन कराळे, प्रविण राठोड, इंद्रजीत चव्हाण, प्रवीण राठोड, अंजली पाढेन, गणेश मेंढे आदी उपस्थित होते

Copyright ©