यवतमाळ सामाजिक

आर्णी येथील येरावार संगणक टंकलेखन व अर्णवी संगणक टंकलेखन संस्थेची मान्यता रद्द

आर्णी येथील येरावार संगणक टंकलेखन व अर्णवी संगणक टंकलेखन संस्थेची मान्यता रद्द

शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकार्‍याने केली शासनाची दिशाभूल

यवतमाळ – आर्णी येथील येरावार टंकलेखन आणि संगणक टंकलेखन या संस्थेची मान्यता शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी रद्द केली असून या संस्थेला तीने केलेल्या सततच्या बेकायदा कृत्याबाबत वेळोवेळी यवतमाळ शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी शेंडगे यांनी दिशाभूल करुन खोटे अहवाल दिले व 5 वर्षे पर्यंत येरावार संस्थेने मनमानी केली परंतु दि. 16 जून 2022 रोजी शिक्षण उप संचालक अमरावती विभाग, अमरावती यांनी या संस्थेची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे आदेश दिल्याने आता या संस्थेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊच नये असे आवाहन ही करण्यात आले आहे.
आर्णी येथील येरावार टंकलेखन व संगणक टंकलेखन ही संस्था गेले 5 वर्ष अत्यंत बेकायदेशीररित्या चालविण्यात येत होती. केवळ कागदावर असलेल्या संस्थेने नमुद केलेल्या जागेत ही संस्था सुरु नव्हती शिवाजी नगर धान्य गोदाम जवळ आर्णी टंकलेखनासाठी प्रवेशीत विद्यार्थी सराव करतात व कार्यालयीन अभिलेखानुसार येरावार टंकलेखन संस्था आर्णी येथे शासन मान्यता प्राप्त आहे. सदर ठिकाणी चौकशी समिती ने भेट दिली असता इंस्टीट्युट बंद असल्याचे दिसून आले. 6 संगणक संच बंद अवस्थेत धुळखात असल्याचे आढळले. खोलीत 9 मॅन्युअल मशिन दिसून आल्या परंतु मशिनचा वापर होत नाही हे चौकशीत आढळून आले. मान्यता दिलेल्या जागेतच संस्था चालविणे आवश्यक आहे. आयजीएम कम्प्युटर एज्युकेशन जवळा या अनधिकृत संस्थेचे विद्यार्थी परिक्षेला बसविले जाऊ नये याबाबत तक्रार असल्यास शासन मान्यता काढून घेण्याची कारवाई होऊ शकते असे असतांना ही येरावार टंकलेखन संस्थेने आदेश व मान्यता नियमाचे पालन न करता सतत उल्लंघन केले आहे. या बाबत गेले 5 वर्ष सुदेश सालोडे यांनी शिक्षण विभाग यवतमाळ यांच्याकडे तक्रारी केल्या. उपसंचालक अमरावती यांच्याकडे ही तक्रार केली. तब्बल 5 वर्षेपर्यंत शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी शेंडगे यांनी वेळोवेळी दिशाभूल करणारा खोटा अहवाल शासनाकडे पाठवून या बोगस संस्थेला सतत पाठबळ दिले परंतु शेवटी सालोडे यांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडे आणि उपसंचालक अमरावती यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्यात. तेंव्हा 16 जून 2022 रोजी संस्थेची मान्यता रद्द करणारा आदेश पारित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आता या संस्थेत प्रवेश घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. या पूर्वी जवळा येथील आयजीएम कॉम्प्युटर एज्युकेशन या अनधिकृत संस्थेचे विद्यार्थी येरावार टंकलेखन संस्थेकडून परिक्षेला बसविण्यात येत होते व शिक्षणाधिकारी सतत 5 वर्ष याकडे कानाडोळा करुन खोटे अहवाल पाठवित होते. त्यामुळे सुदेश सालोडे यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत नव्हती परंतु उपसंचालक शिक्षण विभाग अमरावती यांनी या बाबत मान्यता रद्द करण्याचा आदेश नुकताच पारित केला आहे. विद्यार्थ्यांनी येरावार व अर्णवी टंकलेखन तसेच आयजीएम कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेत (जीसीसी – टीबीसी) संगणक टायपिंगसाठी प्रवेश घेऊन स्वताचे नुकसान करु नये असे आवाहन ही करण्यात आले आहे.

Copyright ©