यवतमाळ सामाजिक

विद्युत कंपनीची मनमानी,यवतमाळ तालुक्यातील गावे जोडली दारव्हा तालुक्यात

विद्युत कंपनीची मनमानी,यवतमाळ तालुक्यातील गावे जोडली दारव्हा तालुक्यात

शेतकरी, व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

आर्णी तालुक्यातील लोणी संबस्टेशन अंतर्गत हिवरी रुई सर्कल मधील गावे दारव्हा तालुक्याला जोडली असल्याने हीवरी रुई सर्कल मधील जनतेला नाहक वेठीस धरण्याचा प्रकार करण्यात आला असल्याने सर्वत्र संताप वेक्त करण्यात येत आहे शासन निर्णया नुसार ज्या तालुक्यातील गावे त्याच तालुक्यात असणे आवश्यक असताना यवतमाळ तालुक्याला गावे हि दारव्हा तालुक्याला जोडण्याचा अफलातून प्रकार झाला असल्याने हजारो लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे,या निर्णयाने सर्वत्र संताप वेक्त करण्यात येत आहे हीवरी व रुई सर्कल मधील गावे जिल्ह्याच्या ठिकाणीच तालुका येत असल्याने या सर्कल मधील पंधरा ते वीस गावे असून ती गावे यवतमाळ डीव्हिजन लाच स्थित राहू देण्याची मागणी अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांना निवेदना द्वारे केली आहे हीवरी रुई सर्कल मधी पंधरा ते वीस गावांवर एक प्रकारची हुकूम शाही करून अन्याय करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे याची त्वरित दखल घेऊन याच सर्कल मधील एक कनिष्ठ अभियंत्याचे कार्यालय देऊन या गावांना यवतमाळ डीव्हिजनाला जोडण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे अधिक्षक अभियंता यांना बाळासाहेब मांगुळकर,गजाननभाऊ डोमाळे रमेशभाऊ भिसंकार यांच्या नेतृत्वात अमोल महेर,राहुल पारधी ओंकार चेके, व शेकडो ग्रामस्थानी केले आहे.

Copyright ©