यवतमाळ सामाजिक

चौदा वित्त आयोगाच्या निधीचा सरपंच सचिवाकडून अपहार ; बंडू तोडसाम यांनी केली चौकशीची मागणी

घाटंजी प्रतिनिधी अमोल नडपेलवार

चौदा वित्त आयोगाच्या निधीचा सरपंच सचिवाकडून अपहार ; बंडू तोडसाम यांनी केली चौकशीची मागणी

तालुक्यातील चोरा़बा येथिल .सरपंच व सचिवाने बोगस बिले काढून अपहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडू तोडसाम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे. गावविकासाठी थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून वित्त आयोगा कडून निधी दिल्या जातो. चोरांबा या ग्रामपंचायतला सुध्दा शासनाच्या निकषानुसार चौदा वित्त आयोगाचा निधी देण्यात आला. परंतु चोरांबा ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांनी गावातील विविध कामात रोजगार सेवकाच्या मदतीने गावातील नाली उपसने, सॅनीटाइजर वाटने, इत्यादी वस्तूचे पैसे काढले आहेत व सचिव प्रभारी व्यक्ती नंतर ४/५/२०२०पासून सिसिटीव्ही कॅमेरे, बसविने, फिल्टर बसविने, एल एल डी लाईट लावने, कम्प्युटर, प्रिंटर झेरॉक्स मशीन सेनिट्रझर, फवारणीची, मशीन इत्यादी बाबींवर लाखो रुपये प्रत्यक्ष कामे न करता बोगस बिले जोडून धनादेश काढण्यात आले आहे.अशी तक्रारीत नमूद केले आहे दि.३१/५/२०२२या रोजी चौकशीत फक्त तीन दिवसांत आणून दिली जाणार होते. परंतु आतापर्यंत गटविकास अधिकाऱ्यांना त्या फाईल कडे दुर्लक्ष केले जात आहे. बऱ्यचवेळा निवेनाद्वारे व तोंडी विचारणा केली असता गटविकास अधिकारी याकडे हेतूुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे. अश्या प्रकारची तक्रारकरत्याकडून व्यत केली जात आहे.
केवळ कागदोपत्री वस्तूंची खरेदी दाखवून लाखो रुपयांचा अपहार केला असून कोणतीही कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांमधे संताप व्यक्त केला जात आहे
या भ्रष्टाचाराची वरिष्ठ स्थरावरून चौकशी व्हावी या करीता अनेकदा निवेदने देण्यात आली परंतु आजपर्यंत कसल्याही प्रकारची चौकशी झाली नाही.
या भ्रष्टाचाराची निरपेक्षपणे चौकशी झाली नाही तर स्वतंत्र दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाला बसण्याचे बोलून दाखवले आहे तक्रारदार व ग्रामसथांनी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व ललीतकूमार व-हाडे साहेब यांची भेट घेतली होती यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.दि.२/८/२०२२ रोजी पंचायत समिती घाटंजी चे गटविकास अधिकारी त्यांची जाऊन प्रत्यक्ष बोलून प्रतिक्रिया त्यांच्या कडून १-४हे भरणा करून खातेची चौकशी होऊन मी संबंधित अहवाल सादर केला आहे यांची चौकशी संबंधित अधिकारी यवतमाळ पंचायत विभाग कडे सोपवली आहे.

Copyright ©