यवतमाळ सामाजिक

अर्जुना येथे सुरक्षित फवारणीबाबत कृषी विद्यार्थ्याकडून मार्गदर्शन

अर्जुना येथे सुरक्षित फवारणीबाबत कृषी विद्यार्थ्याकडून मार्गदर्शन

मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतात फवारणी करतेवेळी विषबाधा होवु नये यासाठी कशी काळजी घ्यावी याबद्दल
अर्जुना येथे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी भिषेक जोगे ,सुरज गोल्हर,गोपाल वशिमकर, महेष भोयर, सौरभ वाळके यांनी शेतकऱ्यांना सुरक्षा किटचे महत्व तथा किटकनाशक कसे हाताळावे याबाबत मार्गदर्शन केले. फवारणी करतांना संरक्षण कपडे घालावेत, नाक व तोंडावर मास्क वापरावा, फवारणी करताना औषध येणार नाही याची काळजी घ्यावी, औषध बॉटल खोलत असताना तोंडाने न उघडता अवजारांचा वापर करावा, बांधावर फवारणी कशी करावी, तसेच
किटकनाशकाच्या डब्यावरील पतंगाच्या आकारच्या लाल, पिवळया, निळया, हिरव्या रंगाची दाहकता समजावून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए ठाकरे, उपप्राचार्य एम.व्ही. कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. व्ही. महानुर,विषयतज्ञ प्रा.एस. टी. भोयर यांचे मार्गदर्शन लाभले.

Copyright ©