यवतमाळ सामाजिक

गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने थोर नेत्यांची जयंती साजरी

गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने थोर नेत्यांची जयंती साजरी

गुरुदेव सेवा मंडळ मंगरुळ तरोडा व अण्णाभाऊ साठे समाज मंडळ तसेच समस्त मंगरूळ ग्रामवासीयातर्फे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०२ जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम ‘ सामुदायिक प्रार्थना अष्टक ‘ व संपूर्ण प्रार्थनेचा परिपाठ घेण्यात आला. मंगरूळ गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य बबन चव्हाण यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, उस्ताद लहूजी साळवे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व ग्रंथसंपदा अद्यापही सामान्य जनांपर्यंत पोहोचली नाही. ग्रामीण भागात आजही काही विचारवंतांच्या व लोकांच्या बाबतीत वावडे आहे. कोण अण्णाभाऊ ? त्यांच्या साहित्याच आमच्याशी काय नातं ? असे विविधांगी प्रश्न उभे करून तो कितीही महान व्यक्ती असला तरी त्याला जात- धर्माच्या जोखडात बंदिस्त करून कमी लेखण्याचा प्रयत्न होतो. हेच अण्णाभाऊ उच्चवर्णीय समाजात जन्माला आले असते तर त्यांचं साहित्य घरोघरी पोहोचवीलं असतं. जशा आध्यात्मिक काल्पनिक आख्यायिका पोहोचवीणारे कर्मठ आहे तसे ,पण अण्णा भाऊंचे एकूणच सामाजिक वलय व त्या परिस्थितीतून मार्ग काढत जी साहित्य संपदा निर्माण केली त्या बहुआयामी व्यक्तिमत्वास साष्टांग दंडवत घातलेच पाहिजे असे डॉ अनंतकुमार सूर्यकार, संघटक यवतमाळ तालुका गुरुदेव सेवा मंडळ यांनी प्रसंगानुरूप प्रतिपादन केले.
संजय कांबळे, यांनीही अण्णाभाऊंच्या लेखणीची प्रशंसा केली.
ताराचंद चव्हाण, भगवान घुटके, राहूल मानकर, विठ्ठल कोडापे, सुधाकर धोंगडे, नारायण सूर्यकार, किशोर लंबे, गिरीधर भगत, रूपेश चव्हाण, परशराम चव्हाण, सचिन कांबळे, जीवन ढोके, मयूर ढोके, गजानन मोडले, मोहन जाचक, बाळू जाचक, ज्ञानेश्वर मोडले, भूषण सोनटक्के, अक्षय सोनवणे, राधाताई मोडले यांची उपस्थिती होती.
रामेश्वर गावंडे , ज्ञानेश्वर कोडापे, महादेव तुमडाम, गणेश सोनोने, विजय ढोके,चेतन काळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट केले.
अरूण सोनटक्के यांनी बहारदार सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले व राष्ट्रवंदनेने जयंतीचा समारोप झाला.
.

Copyright ©