यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना दिली शपथ

सुसंस्कार विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना दिली शपथ

यवतमाळ येथील सुसंस्कार विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा अत्यंत नियोजनात्मक रित्या आयोजित करण्यात आला.लोकशाही राज्यातील प्रजातंत्र कारभाराची जाण विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास व्हावा त्याचबरोबर त्यांच्या जीवनाला एक शिस्तबद्ध वळण लागावे या दृष्टिकोनातून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात निवडणुकीद्वारे निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा घेण्यात आला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांची रेड, ब्ल्यू, ग्रीन आणि येलो अशा चार गटात विभाजन करण्यात आले. लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकी प्रमाणे प्रत्येक गटाचे गटप्रमुख निश्चित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पारेख ऑप्टिकल चे संचालक पारेख तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सदस्य गणेशजी गुप्ता तसेच शाळेचे सचिव के. संजय व शाळेच्या मुख्याध्यापिका यांची उपस्थिती लाभली.
सर्वप्रथम निवडणुकी द्वारे निवडला गेलेल्या हेड बॉय मयुरेश काळे व हेड गर्ल राशी गुगलिया यांना मुख्याध्यापिका सौ.के. उषा यांच्या हस्ते ध्वज देऊन शपथ देण्यात आली. असिस्टंट हेडबॉय म्हणून रुजुल राऊत व असिस्टंट हेड गर्ल म्हणून खुशी गुगलिया यांना सचिव के. संजय सर यांच्या हस्ते ध्वज करण्यात आला.
यानंतर चारही गटप्रमुख रेड हाऊस सुधांशू अफुणे,हर्षदा रोहनकर सहाय्यक गटप्रमुख दैवत महाजन, आस्था बेंडे ब्ल्यू हाऊस गटप्रमुख योजित खोडके, ईश्वरी नस्करी सहाय्यक गटप्रमुख अभिषेक बखाल,पूर्वा देशमुख ग्रीन हाऊस गटप्रमुख देवर्ष बागवाले, अंजली महल्ले सहाय्यक गटप्रमुख मंदार बोरकर, अदिती रानडे येलो हाऊस गटप्रमुख आदित्य बोनगुलवार, मधुरा हर्षे सहाय्यक गटप्रमुख निनाद खारोल, कृष्णाई पिसे यांचा शपथविधी पार पडला. प्रत्येकाच्या हातात गटप्रतिक म्हणून ध्वज देण्यात आला. तसेच क्रीडा प्रतिनिधी अथर्व ठाकरे, अनुश्री गिरटकर आरोग्य प्रतिनिधी आर्यन वखरे, पवित्रा देऊळकर यांनाही यावेळी मुख्याध्यापिका सौ. के. उषा यांच्याद्वारे शपथ देण्यात आली.
यानंतर प्रत्येक वर्गातून निवडलेल्या दोन वर्ग प्रमुखांना शपथ देण्यात आली. वर्ग पहिलीतून शिवांशी राठोड, शिवन्या मिश्रा वर्ग दुसरीतून मोहनीश गोरे,जान्हवी शेटे वर्ग तिसरीतून अवनीश बिजवे सावी दाभाडकर वर्ग चौथी तून विहान फ्रेंडर, पर्णवी भैद वर्ग पाचवीतून तेजस लुटे, आराध्या चौधरी वर्ग सहावीतून अंशुल काळे, जागृती राठोड, सार्थक उगले, जिज्ञासा शिरसागर वर्ग सातवितुन भार्गव परोपटे, ब्राह्मी जवळकर वर्ग आठवीतून ओम मोकलकर, दिव्या भांबेरे वर्ग नववीतून अंश शिंदे, श्रावणी चंद्रे वर्ग दहावीतून संकेत गुल्हाने, गौरी खेडकर या सर्वांना शपथ देण्यात आली. शपथ घेताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा चेहरा आत्मविश्वासाने व अभिमानाने फुलला असून नेमून दिलेल्या कार्य करण्यात तत्पर आहोत अशी हमी भरणारा होता. प्रत्येकाच्या नियुक्तीला इतर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. कार्यक्रमाचे प्रमुख होते पारेख यांनी विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या शिस्तीचे कौतुक केले आणि भावी जीवनातील यशस्वी तेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले शाळेचे सदस्य गणेश जी गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून कार्य करण्यास प्रेरित करणारे मौल्यवान मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या शिक्षिका सौ. वैशाली चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Copyright ©