यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथे दिनांक ५ ऑगस्टला १० वी, व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

दिग्रस येथे दिनांक ५ ऑगस्टला १० वी, व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

आमदार संजय राठोडांकडून विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू.

दिग्रस तालुक्यातील पत्रकार संघटनांचा पुढाकार .

आमदार संजय राठोड, प्रेस क्लब दिग्रस, स्व पी.एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघटना, व दिग्रस तालुका पत्रकार संघटणा यांच्या सायुक्तविद्यमाने या वर्षी १० वी १२ वीत ८० टक्केच्या वर गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, शुक्रवार, ०५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता येथील बुटले महाविद्यालया समोरील जुना दारव्हा रोडवरील मातोश्री विमलादेवी चिरडे मंगल कार्यालयात आमदार संजय राठोड यांच्या शुभहस्ते व शहरातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
कोरोणाची दोन वर्षांचा काळ वगळता या विभागाचे आमदार संजय राठोड दरवर्षीच १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळ्याला महत्त्व देत दिग्रस विधानसभा मतदारसंघातील दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत आहेत. या निमित्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , ऑफिस फाईल, नोटबुक व भेटवस्तू सुध्दा देण्यात येत आहे, गरिब गरजवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हवी ती मदत त्यांनी केली असून या पुढेही ते मदत करीत राहणार आहेत.
आपल्या राजकीय क्षेत्रातील धावपळीच्या या काळात विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी आमदार संजय राठोड यांनी पुढाकार घेऊन हि जबाबदारी येथील पत्रकारांच्या खांद्यावर टाकली असून १० वी व १२ मध्ये ८० टक्केच्या वर गुणप्राप्त विद्यार्थ्यांच्या याद्या शाळा महाविद्यालयातून प्राप्त करण्यात आल्या असून त्या सर्वांना फोन व मॅसेज देऊन उपस्थित रहावे असे कळविण्यात येत आहे. हा अभिनव सोहळा ०५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता, येथील बुटले महाविद्यालया समोरील जुना दारव्हा रोडवरील मातोश्री विमलादेवी चिरडे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. दिग्रस येथील परंतू बाहेरगावी असलेले विद्यार्थी , अथवा अनाधावनाने एखाद्या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव सुटले असेल अश्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत सोबत घेऊन आपली नोंद शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे करावी विशेष म्हणजे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्याचा त्यांच्या आईवडिलांसह सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आईवडिलांसह उपस्थित राहून सत्कार स्वीकारण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

Copyright ©