यवतमाळ सामाजिक

माझी जिल्हा परिषद सदस्य यांनी ठोकले इंडियन बँकेला कुलूप

प्रतिनिधी  धीरज शेरकर

माझी जिल्हा परिषद सदस्य यांनी ठोकले इंडियन बँकेला कुलूप

भांब (राजा )येथील इंडियन बँकेला गेल्या दोन महिन्यापासून शाखाधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पिक कर्ज,पिक विमा, तसेच शेतकऱ्यांची ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकर्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर. व्यवस्थापक विणाच चालत असल्याने कुणाचेही व्यावहार होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे
संतोष नत्थु राठोड बेचखेडा ५ व्या महिन्यात बोजा दिला मात्र पैसे न देताच व्यावस्थापक सुट्टीवर निघून गेले. ब्यांकेच्या आधारे शेतीतील बी बियाने खरेदी केली परंतु ब्यांकेने कर्जच दिले नसल्याने नको त्या वस्तू कुठे गहाण ठेवल्या तर काही पाळीव प्राणी हि विकावे लागले आणि शेतात पेरणी केली कारण सात बाऱ्यावार बोजा चढल्याने या शेतकऱ्याच्या आणखी अडचणीत भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला तर अनेक शेतकरी पीक कर्जा पासून वंचित राहिल्याने शेकडो शेतकरी या ब्यांके मुळे त्रस्त झाले आहे या प्रकरणी रमेश भिसंनकार यांनी जिल्हा अधिकारी यांच्या कडे तक्रार हि दाखल करण्यात आली तर आज भाजपा च्या वतीने भांब राजा येथील इडीन ब्यांकेच्या शाखेला कुलूप ठोकण्यात आले होते.
,अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार तीबार पेरणीचे संकट ओढवले,त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.ही तक्रार भांब (राजा ) सर्कल मधील , बेचखेडा,हिवरी,वाटखेड,चांदापूर, मांगूळ,रुई-वाई,इत्यादी गावातील
असंख्य शेतकरी व निराधार ज्यांचे पैसे काढण्यासाठी दोन दोन दिवस लागत आहे,विड्रॉल होत नाही त्यामुळे वृद्ध लोकांचे हाल होत आहे याची तक्रार
माजी जिल्हा परिषद सदस्या सौं.रेणुताई संजय शिंदे यांचेकडे केली,असता यांचे नेतृत्वात असंख्य शेतकरी व भाजप कार्यकर्ते बँकेवर धडकले व बँक कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
सौं.रेणुताई शिंदे यांनी फोनद्वारे यवतमाळ येथील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या घटनेची माहिती दिली असता आठ दिवसात बँकेला व्यवस्थापक येईल असे आश्वासन दिले येत्या आठ दिवसात व्यावस्थापक नं मिळाल्यास शेतकऱ्यांना घेऊन एक तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सौं. रेणुताई शिंदे यांनी सांगितले.या आंदोलनाला भाजपाचे किसान मोर्च्या चेअध्यक्ष संतोष काळे वाई,भाजपाचे संजय शिंदे पाटील अजय धुरट,उपसरपंच बोरिसिंह,राहुल पारधी सरपंच वाटखेड,किशोर लंके,सचिन भेडेकर मांगूळ,बाळू काळे भांब,मारुती राठोड बेचखेडा,अविनाश चिंचोळकर,निलेश राऊत रुई, शेषेराव मुरमुरे,हरिभाऊ वाघमारे,किशोर कुंभारे मांगूळ,निर्मला मनोज वसू भांब,रामधन राठोड, विठ्ठल ठाकरे,धीरज शेरकर,किशोर केराम, यावेळेस मोठया प्रमाणात शेतकरी व गावकरी उपस्थित होते.

Copyright ©