यवतमाळ सामाजिक

पाच वर्ग एक शिक्षक,शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आदिवासी विद्यार्थ्याचे भविष्य होणार अंधकार मय

पाच वर्ग एक शिक्षक,शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार
आदिवासी विद्यार्थ्याचे भविष्य होणार अंधकार मय

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळा असुन एक ते पाच वर्गापर्यंत शाळा आहे मात्र या शाळेला केवळ एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्याना कसे शिकवायचे आणि कोणत्या वर्गाला शिकवायचे असा प्रश्न शिक्षकाला निर्माण झाला असल्याने येथील पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रथमच वाटखेड हे गाव संपुर्ण आदिवासी समाजाचे आहे त्यात शिक्षक नाही मग या शाळेचा काय उपयोग असा सवाल पालक वर्गा कडून करण्यात येत आहे या ठिकाणी त्वरीत चार शिक्षक देण्याची मागणी ग्रामवाशिया कडून करण्यात येत आहे.

Copyright ©