यवतमाळ सामाजिक

मोठमोठ्या बेलवृक्षाची कत्तल करून बेलपत्राची विक्री करण्यात येते

मोठमोठ्या बेलवृक्षाची कत्तल करून बेलपत्राची विक्री करण्यात येते

संत तुकाराम म्हणतात, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे ’
शुक्रवार २९ जुलै पासून मराठी श्रावण महिना सुरू झाला आहे, हा महिना खूप पवित्र मानला जातो, हया महिन्यात महादेवाला बेलपत्र, बेलफळ खूप प्रिय आहे म्हणून आस्थेने अर्पण केली जातात, अशातच सम्पूर्ण श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी भाविक महादेवाच्या पिंडीवर मोठ्या श्रद्धाभावनेने बेलपत्र वाहतात, ह्याच कारणाने बेलपत्र विक्री करणारे विक्रेते, कळत नकळत मोठमोठ्या बेलवृक्षाची कत्तल करून बेलपत्र गोळा करून विक्रीसाठी मंदिरापुढे, चौकाचौकात व बाजारात उपलब्ध करून देतात, असेच जर बेसुमार बेलवृक्ष तोडणे चालू राहिले तर बेल वृक्ष नामनेश होण्याची भीती आहे, त्यामुळे सर्व बेलपत्राची विक्री करणाऱ्या व्यक्तींना तळमळीची विनंती आहे, सम्पूर्ण बेलवृक्षाची कत्तल (तोड) न करता फक्त बेलपत्र गोळा करून बाजारात आणून विक्री करावी, आपण आणलेले बेलपत्र महादेवाला पावन झाले पाहिजे, महादेवावर आमच्या सर्वांची खूप श्रद्धा,आस्था आहे, अशी तर्क विनंती पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हाअध्यक्ष,तथा संकल्प फाऊंडेशनचे शहराध्यक्ष विनोद दोंदल यांनी केली आहे,
संत तुकाराम म्हणतात, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे ’ हया पावन श्रवण महिन्यात बेलवृक्ष रोपण केले तर खूप पुण्य मिळते, झाडे लावा झाडे वाचवा असाही संदेश दोंदल यांनी दिला आहे.

Copyright ©