यवतमाळ सामाजिक

खासदार संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात शिवसैनिकाचे आंदोलन

खासदार संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात शिवसैनिकाचे आंदोलन

केंद्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी, शिवसैनिकांचे रस्त्यावर उतरून आंदोलन

यवतमाळ:
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने आकासपूर्ण कारवाई केल्यानंतर यवतमाळ मध्ये शिवसेनेच्या वतीने शहरातील दत्त चौक यथे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड,जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवार,विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर राज्यभरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये देखील शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी विरोधात, केद्रं सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येऊन कारवाई मागे घेण्याची मागणी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.या कारवाई बद्दल शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे म्हणाले की ईडी सारख्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासदार राऊत हे शिवसेनेचा बुलंद आवाज आहे त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून ही कारवाई सुडबुद्धीने केली जात आहे .संजय राऊत ते शिवसेनेची बाजू भक्कम पणे मांडतात पक्षाचा आवाज बुलंद करतात म्हणून त्यांना अटक करण्यात आली असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केला. तर राजेंद्र गायकवाड यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत खा. संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईची निषेध नोंदवला.भाजप ही वॉशिंग मशीन झाली असून ती अनेकांना पवित्र करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संसदेचे अधिवेशन सुरू आहे त्यामुळे संजय राऊत यांना अटक व्हायला नको होती अशी भूमिका राजेंद्र गायकवाड यांनी यावेळी व्यक्त तर कोशारी यांना महाराष्ट्रा मधून बाहेर काढा असेही आवाहन केले.विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा ह्यांच्यावर तिखट शब्दात एकच हल्ला चढवला.जनता ह्या सर्व कारस्थानाचा वचपा मतपेटीतून काढील असे ते म्हणाले.भाजप जर अजूनही ताळ्यावर येत नसेल तर मला मानवी बॉम्ब बनावे लागेल असे म्हणून त्यांनी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडवून दिली.महिला आघाडी जिल्हा संघटिका निर्मलाताई विनकरे,जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा,शहर प्रमुख अतुल गुल्हाने यांनी देखील ह्या ईडीच्या कारवाईचा आपल्या भाषणातून तीव्र शब्दात निषेध केला.ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे,उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा, तालुका युवा अधीकारी पवन शेंद्रे,व्यापारी आघाडी जिल्हा संघटक प्रवीण निमोदीया,शेतकरी सेनेचे अशोक पुरी,शहर प्रमुख निलेश बेलोकर,शहर प्रमुख योगेश भांदक्कर,शहर प्रमुख अतुल गुल्हाने,शहर संघटक चेतन शिरसाठ,शहर समन्वयक तुषार देशमुख,जिल्हा संघटिका निर्मलाताई विनकरे,शहर संघटीका कल्पना दरवाई,युवा सेना जिल्हा समन्वयक अमोल धोपेकर,युवसेना उपजिल्हा युवा अधिकारी गिरीजानंद कळंबे,व्यापारी आघाडी उपजिल्हा प्रमुख सुजित मुनगिनवार,उपतालुका प्रमुख चंद्रकांत उडाखे,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रुपेश सावरकर,युवासेना जिल्हा चिटणीस श्रीकांत मीरासे,आदिवासी आघाडी प्रमुख वसंत कंगाले,गार्गीताई गिरडकर,विधी व न्याय विभाग प्रमुख अभिजित बायस्कर,संजय उपगनलावार, राहुल गंभीरे,प्रफुल गजभे, पवन अराठे,चेतन जगताप,निलेश साबळे,विनोद राऊत,विनोद नेमाने,शैलेंद्र तांबे,निरव गढीया,अभिनव वाडगुरे,गोपाल अग्रवाल,रुपेश सरडे,चुनारकर,दीपक सुकळकर,दिनेश इंगळे,रामकृष्ण घरडे,फिरोज पठाण,दीपक काळे,नारायण उईके,अतुल तोरखडे,पद्माकर काळे,शंकर देउळकर,उमेश पुडके,संतोष गदई,नितीन उके,अनिल डिवरे,सचिन बारसकर,गोलू जोमदे,रवी राऊत,संतोष सोनकुसरे,विक्रम सोळंकी, रुपेश राठोड,राजेंद्र गावंडे,विनायक फुल्लूके,कुणाल राडे,सौ स्मिता दुर्गे,ओम ठेंगरी,चेतन तट्टे, सागर गोडे, संजय जाधव,संतोष चव्हाण,हेमंत उगले व शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©