यवतमाळ सामाजिक

माझ्यासाठी जिल्हा आणि राज्य पुरस्कारापेक्षा ग्रामप्रशासनाने दिलेला पुरस्कार मोठा- सहा.शिक्षक बाबुराव शेरकार

माझ्यासाठी जिल्हा आणि राज्य पुरस्कारापेक्षा ग्रामप्रशासनाने दिलेला पुरस्कार मोठा- सहा.शिक्षक बाबुराव शेरकार
**************************************
आझादी का अमृत महोत्सव उपक्रम
———————————————————–
ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांची संकल्पना
———————————————————–
सहा.शिक्षक बाबुराव शेरकार यांना गुरू गौरव सन्मान 2021 प्रदान

जिल्हा किंवा राज्य पुरस्कारापेक्षाही ग्रामस्थांनी दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे प्रतिपादन वरुड फक्त येथील स. शिक्षक बाबुराव शेरकार यांनी केले.

ते ग्रामपंचायतच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत आयोजित “गुरु गौरव सन्मान 2021” पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

बाबुराव शेरकर हे पंचायत समिती आर्णी अंतर्गत येणाऱ्या वरुड भक्त येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांचे कार्य उल्लेखनीय असे राहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षामध्ये विद्यार्थी यशस्वी व्हावा व गुणवंत विद्यार्थी घडावा यासाठी परिश्रम घेऊन अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेमध्ये यशस्वी केले आहे. आजवर त्यांचे 4 विध्यार्थी नवोदय तर अनेक विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहे. कोविड काळामध्ये देखिल त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. शिवाय ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने नियमित सहकार्य करीत असतात. आणि त्यांनी आपल्या मुलाला आपल्याच शाळेत मुख्यालयी दाखल केले आहे. हेही नसे थोडके…!

याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन वरुड भक्त येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी त्यांना गुरु गौरव सन्मान 2021 देण्याबाबतचा प्रस्ताव ग्राम प्रशासनाला सोबत घेऊन मान्य करून घेतला आणि त्यांना एका विशेष सोहळ्यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या उपस्थितीत गट शिक्षणाधिकारी किशोर रावते यांच्या शुभ हस्ते सन्मानपूर्वक बहाल केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंकज मुनेश्वर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, गट शिक्षण अधिकारी किशोर रावते, विस्तार अधिकारी प्रफुल ठेंगेकर, गोविंद इंगोले, सेवा निवृत्त मुख्याध्यापक यु.बी. कांबळे, उपसरपंच अरविंद चव्हाण, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन विजयकुमार ठेंगेकर तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मुरखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र काळे, संगणक चालक गणेश राठोड, अनिल खराबे व सहकारी मित्रांनी परिश्रम घेतले.

Copyright ©