सामाजिक

*राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी म. सा. यांच्या जन्मोत्सव तप धर्म आराधनाने संपन्न*

 

विदर्भ स्तरीय भक्तीगीत स्पर्धेत हिंगणघाटच्या चमुने पटकविला प्रथम क्रमांक

यवतमाळ – स्थानिक देवजी निसर्ग जैन धर्म स्थानक राजेंद्र नगर यवतमाळ येथे दि. 22 जुलै ते 29 जुलै या दरम्यान तप महर्षी अक्षय ऋषीजी म. सा., मधुर व्याख्यानी अमृत ऋषीजी म. सा., नवदिक्षीत गितार्थ ऋषीजी म. सा. यांच्या सानिध्यात आचार्य आनंद जन्मोत्सव तप, जप, धर्म आराधना तसेच विविध स्पर्धांच्या आयोजनातून संपन्न झाले.
दि. 28 जुलै रोजी आयोजित विदर्भ स्तरीय भक्तीगीत स्पर्धे मध्ये हिंगणघाट येथील बहु मंडळाने प्रथम क्रमांकाचे 11 हजार रुपयाचे पुरस्कार व मानचिन्ह जिंकले. या चमुचे नेतृत्व ललीता नहार, सरिता चोपडा, अर्चना बोथरा, सरिता ओसवाल, उज्वला कासवा, ममता लोढा, संगीता चोपडा, किर्ती मुनोत यांनी केले. द्वितीय पुरस्कार यवतमाळ येथील राष्ट्रसंत भक्ती मंडळ याने 9 हजार रुपये व मानचिन्ह तर तृतीय पुरस्कार मैत्री महिला मंडळ यवतमाळच्या चमुने 7 हजार रुपये व मानचिन्ह, चौथे पुरस्कार प्रभा महिला मंडळ नेर ने 5 हजार रुपये व मानचिन्ह, पांचवे पुरस्कार आर्णी महिला मंडळ 3 हजार रुपये व मानचिन्ह यांनी जिंकले. या परिक्षेचे परिक्षक म्हणून दिनेश बोरा हे होते.
दि. 29 जुलै गुरुदेव आनंद ऋषीजी म. सा. यांच्या जन्मोत्सवा निमित्त तप महर्षी अक्षय ऋषीजी म. सा. यांना नेहा बंब हिने हस्त लेखा चित्र प्रदान केले तर गुरुदेव आनंद ऋषीजी म. सा. यांच्या 123 व्या जयंती निमित्त कु. श्‍वेता कोठारी व खुशी कोठारी यांनी कागदाने बनविलेला तप आराधनेचे महत्व समजविणारा आकर्षक केक गुरुजनांना प्रदान केले. गुरु आनंद ऋषीजी म. सा. यांच्या जन्मोत्सवा निमित्त गुरु गुणानुवाद या विषयावर मुनिश्रींचे मार्गदर्शन झाले. जन्मोत्सवा निमित्त 108 अठाई पचखान अंतर्गत योगिता मनोज बरतलोटा (17), पुष्पा विजयजी खिवसरा (17), ऋतू अलिजार (9), विजय कुमार बुंदेला (8), कु. हेमांशी विजय बुंदेला (8), शुभम कटारिया (8), संतोष छाजेड (8), सौ. सरला कोटेचा (8), उर्मिला गुगलिया (8), सोनाली नविन खडसे (बोरा) (8), कु. प्रगती भंसाली (8), शोभा बरलोटा (8), सौ. सुशिला महाविर बोरा (8), संगिता बंब (8), संगिता प्रवीण कुमार भंसाली (8), जिनेंद्र माणकचंद काकरिया (8), लोकेश शांतीलाल ओस्तवाल (8), सिमा अजय रेदासनी (8) यांनी 8 उपवासाचे पचखान ग्रहण केले. तप आराधने दरम्यान फक्त गरम पाण्याचे सेवन करुन तप आराधना या तपस्वी बांधवांनी केली त्या निमित्त चातुर्मास समिती यवतमाळच्या वतीने जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, चातुर्मास समितीचे अध्यक्ष अमरचंद गुगलिया यांनी तपस्वी बांधवांना चांदीचा सिक्का, आनंद व्याख्यान मालेची पुस्तिका तसेच आनंद ऋषीजी म. सा. यांची फोटो फ्रेम भेट देवून सत्कार केला तर मागील 8 दिवसापासून सुरु असलेल्या अखंड नवकार मंत्र जपच्या चांदीच्या कलशाची बोली सौ. जया धरमचंद लोढा यांनी घेतली. आज 500 च्या वर जैन बांधवांनी एकास्नाची तप आराधना केली. एकंदरीत जिल्हास्तरावर आनंद जन्मोत्सवाचे विशाल आयोजन पहिल्यांदाच यवतमाळ शहरामध्ये करण्यात आल्यामुळे जन बांधवामध्ये अभुतपूर्व उत्साह संचारला होता.

Copyright ©